Header Ads

कन्टेंमेंट झोन मधील काहींनी शहरातील मध्यवस्तीतील दुकाने उघडून केला साथरोग प्रतिबंधक कायद्याचा भंग : गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांत तक्रार

कन्टेंमेंट झोन मधील काहींनी शहरातील मध्यवस्तीतील दुकाने उघडून केला साथरोग प्रतिबंधक कायद्याचा भंग

५ जणांचे विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी नगर परिषदची पोलिसांत तक्रार 

कारंजा (जनता परिषद) दि.११ - १० जुलै रोजी सिंधी कॅम्प परिसरात कोराना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांचे आदेशानुसार, कंटोन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानुसार एरीयाही सिल करण्यात आला. 
मात्र असे असतांनाही प्रशासानाचे निर्देशास आलेनुसार आज ११ जुलै रोजी कंटोन्मेंट झोन मध्ये राहणार्‍या काही व्यापार्‍यांनी विना परवानगी कंटोन्मेंट झोनचे उल्लंघन करीत प्रतिबंधीत क्षेत्राचे बाहेर येत शहरातील मध्यवस्तीमधील दुकाने उघडली. त्यांच्या या कृत्यामुळे प्रतिबंधीत केलेल्या परिसराच्या बाहेर कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. 
या व्यक्तींनी केलेल्या या बेजबाबदार कृत्यामुळे संसर्गाचा धोका वाढला असून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ चा भंग केलेला आहे. यामुळे सिंधी कॅम्प परिसरातील अमर खुबचंद पंजवाणी (वय ५५वर्ष), सोनू अमर पंजवाणी (वय ३० वर्ष), अशोक ब्रिजलाल पंजवाणी-राजमहल ड्रेसेस (वय ५५ वर्ष), दिपक मयाराम पंजवाणी (वय ३८ वर्ष) तसेच राजेश दयालदास मोटवाणी (वय ४५ वर्ष) यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याचे नगर परिषदचे वतीने उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी कळविले आहे. 
साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम २,३ व ४ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब व भांदवी १८६० चे कलम १८८, २६९, २७० व २७१ नुसार कायदेशीर कारवाई करण्याची व या पाचही जणांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार कारंजा नगर परिषदचे वतीने उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी कारंजा शहर पोलिस स्टेशनला दिली आहे. याबाबत कारंजा पोलिस पुढील कार्यवाही करीत आहे. 

No comments

Powered by Blogger.