Header Ads

शिक्षक आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे कोरोना पॉझिटिव्ह : उपचारार्थ नागपूर येथे रवाना

शिक्षक आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे कोरोना पॉझिटिव्ह : उपचारार्थ नागपूर येथे रवाना 

अमरावती दि.११ - अमरावती विभागाचे शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांच्या आज झालेल्या कोरोना विषयक चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 
अधिक माहितीनुसार, आज सकाळी पिडीएमसी प्रयोगशाळेला ही चाचणी करण्यात आली आहे. सदरहू टेस्ट ही रॅपिड अँटीजन टेस्टींग ने करण्यात आली आहे. यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील व्होकार्ड हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. 
कोरोनाच्या या काळात आपले क्षेत्रातील विविध भागांना भेटी देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी देशपांडे हे नेहमीच सक्रीय राहीले आहेत. विनाअनुदानीत शिक्षकांच्या कामासाठी ते मुंबई येथे कोरोना व चक्रीवादळाचे काळातही तब्बल ८ वेळा गेलेत. काल त्यांना तब्बेतीत थोडा त्रास जाणवत होता, त्यामुळे त्यांची आज टेस्ट करण्यात आली असता दुपारी १२ वाजता ते पॉझिटिव्ह आले. त्यांना तात्काळ नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती प्राप्त आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.