Maharashtra SSC Results 2020 washim district निकाल ९६.०८% रिसोड तालुका सर्वप्रथम ९७.४९% तर कारंजा शेवटचे ९४.८४%
SSC Result 2020 Washim District : 96.08%
Risod First 97.49% while Karanja Last 94.84%
दहावीचा निकाल २०२० वाशिम जिल्ह्याचा निकाल ९६.०८%
रिसोड तालुका सर्वप्रथम ९७.४९% तर कारंजा शेवटचे ९४.८४%
वाशिम (जनता परिषद) दि.२९ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षांचा निकाल आज दुपारी १.०० वाजता जाहीर करण्यात आला.
दहावी परिक्षांचा वाशिम जिल्ह्याचा निकाल एकूण ९६.०८% लागला असून जिल्ह्यातून सर्वप्रथम येण्याचा मान ९७.४९% निकालासह रिसोड तालुक्याने पटकाविला आहे. वाशिम जिल्ह्याचा निकाल ९६.०८% लागला असून एकुण २०,७५६ परिक्षार्थींपैकी २०,६२५ विद्यार्ध्यांनी परिक्षा दिली त्यातील १९,८१८ विद्यार्थी म्हणजेच ९६.०८% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वाशिम जिल्ह्यातील गुणानुक्रमे तालुक्यांची निकालाची टक्केवारी ही पुढील प्रमाणे आहे.
----------------------------------------------------------------------------क्र. व जिल्हा ए.विद्यार्थी परिक्षार्थी डिस्टींक्शन ए. उत्तीर्ण टक्केवारी
----------------------------------------------------------------------------
१.रिसोड ४६२३ ४५८८ २२९५ ४४७३ ९७.४९
२.वाशिम ५०४८ ५०२७ २२४१ ४८५४ ९६.५५
३.मानोरा २१५४ २१२३ ९३५ २०४१ ९६.१३
४.मालेगांव २६६३ २६४३ ७८८ २५१३ ९५.०८
५.मंगरुळपीर २८०६ २७९२ ११२५ २६६३ ९५.३७
६.कारंजा ३४६२ ३४५२ १४०५ ३२७४ ९४.८४
----------------------------------------------------------------------------
ए.निकाल २०,७५६ २०,६२५ ८,७८९ १९,८१८ ९६.०८
----------------------------------------------------------------------------
लागलेला निकाल खाली दिलेल्या ४ संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे तसेच तेथून डाऊनलोडही करता येणार आाहे.
मार्च २०२० मध्ये राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ३ मार्च ते २३ मार्च ह्या दरम्यान परिक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र कोरोना या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर घोषीत लॉकडाऊन मुळे हे निकाल चांगलेच लांवणीवर पडले होते. तसेच भूगोलाचा शेवटचा पेपरही कोरोेनामुळे रद्द करण्यात आला होता.
Post a Comment