Header Ads

Risod News : पथविक्रेत्यांसाठी पीएम स्वनिधी रुपये दहा हजार खेळते भांडवल कर्ज योजना

पथविक्रेत्यांसाठी पीएम स्वनिधी रुपये दहा हजार खेळते भांडवल कर्ज योजना


पथविक्रेत्यांनी लाभ घेण्याचे रिसोडचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे आवाहन 


रिसोड (का.प्र.) दि.१७ - केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुपवठा सुविधा रिसोड नगरीषदेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान विभा्‌गामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी महाराट्र शासनाने दिनांक १७ जून २०२० रोजी शासन निर्णय काढून या योजनेची अंमबजावणी करण्या बाबत सुचना देण्यात आल्या आहेत. यासाठी शहरात पीएम स्वनिधी समिती स्थापन करून यांची सभा व्हिडीओ कॉंन्फरन्स व्दारे घेण्यात आल्याची माहिती शहर प्रकल्प अधिकारी, मुख्यादिकारी गणेश पांडे यांनी दिली. या बैठकिला शहर प्रकल्प अधिकारी तथा मुख्याधिकारी गणेश पांडे, दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान विभागाचे सहा. प्रकल्प अधिकारी राजेंद्र पटटेबहादूर, राष्ट्रीयकृत बँका,फायन्सस कंपनीचे व्यवस्थापक, अर्बन बँकचे व्यवस्थापक, माईक्रो फायन्सस कंपनीचे व्यवस्थापक इत्यादी उपस्थित होते.
शहरातील भाजी फळे खादयपदार्थ, कापड, केशकर्तनालय, पान-टपरी आदी छोटया-मोठया पथविक्रेत्यांच्या व्यवसायावंर कोरोना साथीमूळे त्यांच्या उपजिविकेवर परिणाम झाला आहे. व्यवसाय पुन्हा सुरू होण्यासाठी खेळते भांडवलाचा पुरवठा करण्यासाठी ही योजना राट्रीयकृत बँक व इतर वित्त पुरवठा करण्या-या संस्था यांच्या सहकार्याने सुरू होत असल्याचे गणेश पांडे यांनी सांगीतले. पथविक्रेत्यांना राष्ट्रीयकृत बँक व इतर सुक्ष्म वित्त पुरवठा पुरवठा करणा-या संस्थेकडून १० हजारापर्यंत खेळते भांडवली कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. नियमित परतफेड व डिजीटल प्रोत्साहन देण्याच्या उददेशाने ही संधी उपलबध होत आहे.वेळेत कर्जाची परतफेड करणा-या पथविक्रेत्यास ७ टक्के अनुदानीत व्याज तीन महिण्याच्या अंतराने मिळणार आहे. 
तरी शहरातील पथविक्रेत्याने या योजनेचा लाभ घ्येण्यासाठी http://pmsvanidhi.mohua.gov.in/  या संकेतस्थळावर  ऑनलाईन अर्ज करावा अर्ज करतांना पथविक्रेत्याचा मोबाईल क्रमांक हा त्यांच्या आधार कार्डशी सलग्न असणे आवश्यक आहे. अधिक माहिती करीता नगर परिषेदेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या शहर अभियान कक्षात संपर्क करण्याचे आवाहन नगर अध्यक्ष सौ विजयमालाताई आसनकर तसेच मुख्याधिकारी गणेश पांडे, नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.        

No comments

Powered by Blogger.