Header Ads

दि.१७ जुलै : आज कारंजात ५ पॉझिटिव्ह

दि.१७ जुलै : आज कारंजात ५ पॉझिटिव्ह 

कारंजा (जनता परिषद) दि.१७ - कारंजात कोरोनाचा आकडा हा वाढतच असून नागरिकांनी ही साखळी तोडणेसाठी नियमांचे पालन करणे, अत्यंत गरजेचे झाले आहे. आज दिवसभरात एकुण ५ व्यक्ती ह्या कोेरोना संसर्गित असल्याचे समोर आले आहे. यामध्ये २ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे. महेश भवन परिसरातील पुर्वाबाधीत व्यक्तीचे संपर्कातील महिला, मारवाडीपुरा परिसरातील महिला यांचेसह गवळीपुरा, आनंदनगर व चुनापुरा परिसरातील ३ पुरुष असे एकुण ५ व्यक्तीचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. 
महसुल, पोलिस, नगर परिषद प्रशासन हे ह्या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी ह्या भागांना कंटोन्मेंट करुन तो एरीया सिल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 
कारंजेकरांनी रोजच येणार्‍या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता, दक्ष राहणे गरजेचे झाले आहे. सर्वाधिक ताण हा संपूर्ण प्रशासनावर असून महसुल, पोलिस, आरोग्य, नगर परिषद यंत्रणा ह्यांतील प्रत्येक घटक हा रस्त्यावर उतरून ड्युटी जरी असली तरी स्वत:चा विचार न करीत नागरिकांसाठीच स्वत:चा जीव धोक्यात घालून कार्य करीत आहेत, याची जाणीव ठेवणे गरजेेचे आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.