Header Ads

कारंजा तालुक्यात जिल्हासिमा बंदीची कडक अंमलबजावणी : एकुण २४ चेक पोस्ट कार्यरत

कारंजा तालुक्यात जिल्हासिमा बंदीची कडक अंमलबजावणी

   एकुण २४ चेक पोस्ट कार्यरत  

तहसिलदार धिरज मांजरे यांच्या आदेशान्वये आजपासून १९ चेकपोस्ट सुरु 

पोलिस कर्मचारी सह शिक्षक कर्मचारी करणार कसुन चौकशी 

कारंजा (जनता परिषद) दि.१७ - राज्यात सुरु असलेल्या महाभयंकर कोरोना संसर्गजन्य साथ रोगावर नियंत्रण मिळविणेसाठी जिल्ह्यात लॉकडाऊन ची अत्यंत कडक अंमलबजावणी होत आहे. कारंजा शहरात लॉकडाऊनचे या काळात सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या काळात दुकाने सुरु असून उर्वरित काळात संपुर्णसंचारबंदी आहे. विशेष करुन, बाहेर गावाहुन येणारे व्यक्तींची व बाहेर जाणार्‍या व्यक्तींची कसुन तपासणी केली जात आहे. अत्यावश्यक कारणांशिवाय जिल्ह्यातून बाहेर जाण्यावर तसेच जिल्ह्यात येण्यावर बंदी आहे. आपत्ती व व्यवस्थापन अधिनियम २००५ चेक कलम ३४ अन्वये तसेच साथरोग अधिनियम १८८७ व फौैजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ ची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करता यावी, या उद्देशाने जिल्ह्यातील सर्वच सिमा ह्या सिल करण्यात आल्या आहेत. 
कारंजा शहरामध्ये तसेच तालुक्यातील गावांमध्ये प्रवेश करणार्‍या व बाहेर जाणार्‍या वाहनांची व नागरिकांची तपासणी करण्याबाब आदेश देण्यात आलेले आहेत. कारंजा तालुक्यातून इतर जिल्ह्यांचे लगतच्या सर्वच सिमा सिल करण्यात येऊन प्रथम मुख्य ५ अशा चेक पोस्ट तयार करुन त्या कार्यरत करण्यात आलेल्या आहेत. तर आज दिनांक १७ जुलै पासून कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांच्या आदेशानुसार, पुढील आदेशापर्यंत ग्रामीण भागात एकूण १९ चेक पोस्ट सुरु करण्यात आल्या आहेत. या चेकपोस्ट वर पोलिस कर्मचारी सह शिक्षक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक चेकपोस्ट वर ६-६ तासांच्या वेळांमध्ये अधिकारी व कर्मचारी असे २-२ एकुण ४ जणांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 
कारंजा महसुल प्रशासन व पोलिस यंत्रणा ह्या सर्वच ह्या जिल्हाबंदीचे अत्यंत कडक नियोजन करीत असून पुर्वीच्या ५ व आत्ताच्या १९ अशा एकूण २४ चेकपोस्ट द्वारे कारंजा शहरात व तालुक्यातील गावांमध्ये ये-जा करणार्‍यांची कसुन चौकशी केली जात आहे.    

No comments

Powered by Blogger.