Header Ads

स्विकृत नगरसेवक निसार खान याचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

स्विकृत नगरसेवक निसार खान याचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल 


कारंजा (का.प्र.) दि.११ - कारंजा नगर परिषदमध्ये स्विकृत सदस्य म्हणून असलेल्या निसार खान यांनी एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी कारंजा पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.  
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिनीनुसार, निसार खान याने तुझा मोबाईल नंबर दे अशा शब्दात वाईट उद्देशाने हात धरले व विनयभंग केला अशी तक्रार स्थानीक नेहरु चौक, कारंजा येथे राहणार्‍या २७ वर्षीय महिलेने केली आहे. निसार खान हा अंदाजे जानेवारी २०२० पासून मी मुलाला शाळेत घेऊन जात असतांना माझा पाठलाग करायचा, मात्र आपण त्याचेवर दुर्लक्ष केले. मोबाईलची बॅटरी दाखवून तर कधी हातवारे करुन ईशारे करीत होता, मात्र आपण यांवर दुर्लक्ष केले असेही या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
१० जुलै रोजी दुपारचे वेळेस स्थानीक पुंजाणी कॉम्प्लेक्स येथील बचत बाजार चे गेट जवळ आपण असतांना निसार खानने आवाज दिला. तसेच वाईट उद्देशाने हात धरुन तुमचा नंबर मिळेल कां असा म्हणत विनयभंग केला, अशी तक्रार महिलेने केली आहे. 
कारंजा शहर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंह संहिता १८६० चे कलम ३५४, ३५४(ड) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस करीत आहे. 

No comments

Powered by Blogger.