Header Ads

दि.११ जुलै : आज कारंजात रॅपीड एंटीजेन टेस्ट मध्ये ४ व्यक्ती आलेत कोरोना बाधीत

दि.११ जुलै : आज कारंजात रॅपीड एंटीजेन टेस्ट मध्ये ४ व्यक्ती आलेत कोरोना बाधीत 

कारंजा (जनता परिषद) दि. ११ - रॅपीड अँटीजन टेस्टीग मध्ये आज तालुक्यातील एकुण ४ व्यक्ती कोरोना संसर्ग झालेल्या आढळून आल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील ग्राम कामरगांव येथे आज ३ व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असून यांतील दोघे हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत असून एक व्यक्ती हा काल पॉझिटिव्ह म्हणून आलेल्या व्यक्तीचे परिवारातील आहे. कामरगांवात कालचे १ पकडून ४ रुग्ण झाल्याने चिंता वाढली आहे. 
तर सिंधी कॅम्प येथे पुर्वी कोरोना बाधीत असलेले व्यक्तींचे संपर्कातील १ व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आज दिवसभरात कारंजा मध्ये ४ पॉजिटिव आले आहेत. 
दरम्यान, काल झालेल्या रॅपीड अँटीजन टेस्टींग मध्ये एकुण ५ व्यक्ती हे पॉझिटिव्ह आले होते. ह्या टेस्टींगमुळे कोरोना चाचणीचा अहवाल हा तात्काळ रुपात भेटत असून यामुळे चाचणीत लागणारा वेळ वाचल्याने संपर्क शोधून संसर्ग रोखण्यास मदत मिळणार आहे.

No comments

Powered by Blogger.