Header Ads

पेट्रोल डिजेल दरवाढीचे विरोधात : मानोरा तालुका कॉग्रेस कमेटीचे वतीने गाडी लोटो आंदोलन : Janta Parishad Manora

पेट्रोल डिजेल दरवाढीचे विरोधात

मानोरा तालुका कॉग्रेस कमेटीचे वतीने "गाडी लोटो आंदोलन" 

तहसिलदारांमार्फत महामहीम राष्ट्रपती यांना पाठविले निवेदन 

मानोरा (जनता परिषद, ता.प्र.) दि.३ - दररोज वाढत जाणार्‍या पेट्रोल व डिजेल दरवाढीचे विरोधात मानोरा तालुका कॉग्रेस कमेटीचे वतीने काल दि.02 जुलाई रोजी "गाडी लोटो आंदोलन" करण्यात आले. यामध्ये कॉग्रेसचे स्थानीक नेते व कार्यकर्ते यांनी आपापल्या गाड्या ह्या ढकलत नेऊन अभिनव पद्धतीने ह्या दरवाढीचा विरोध केला. आंदोलनकर्त्यांनी तहसिल कार्यालय येथे जाऊन तहसिलदार साहेबांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांच्या नावाने एक निवेदनही पाठविले. 
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संपूर्ण देशात पेट्रोल डिजेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढले नसतांना आपले देशात मात्र दिवसेंदिवस रोजचेरोज वाढत आहे, यामुळे शेतकरी, गोरगरीब, मध्यमवर्गीय, सामान्य नागरिकाला जगणे कठीण झाले आहे. तरी देशाचे मुख्य या नात्याने स्वत: या विषयात लक्ष्य देऊन ही दरवाढ कमी करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
या आंदोलनात मानोरा नगर पंचायत च्या प्रथम नागरिक नगरपंचायत अध्यक्षा बरखा बेग, मानोरा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष इफतेखार पटेल, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड, बाजार समितीचे उपसभापती राजेश नेमाने तसेच  गजानन राठोड, वसंत भगत, रशीद खान पठाण, महेश जाधव, दिलीप चव्हाण, राजा पटेल. इरफान शहा, अनिल राठोड, हिम्मत निमखडे, राजू सोनोने, संतोष शिंदे, पिंटू जामनिक, प्रकाश सातपुते, डॉक्टर राठोड, किरण राठोड, दुधराम पवार, मोहन राठोड, कपील राठोड, दिलीप पडवाल आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.