Header Ads

Karanja News - रामासावजी चौकात धापा टाकण्या बाबत नगर परिषद ची टाळाटाळ - नवे मुख्याधिकारी ह्यांना पुनश्च निवेदन

रामासावजी चौकात धापा टाकण्या बाबत नगर परिषद ची टाळाटाळ

नवे मुख्याधिकारी ह्यांना पुनश्च निवेदन

     कारंजा (का.प्र.) दि. २२ -  शहरातील शाळा , दवाखाने, मंदिर , मस्जिद सरकारी कार्यालय ह्या ठिकाणी जाण्याकरीता ज्या रामासावजी चौकातुन जावे लागते त्या चौकातील नाली वर धापा टाकण्या संबंधीचे निवेदन दि.11 जुन 2020 रोजी तत्कालीन माननीय मुख्याधिकारी महोदय ह्यांना वाशिम जिल्हा कांग्रेस सेवादल चे जिल्हा समन्वयक अॅड संदेश जैन जिंतुरकर , वाशिम जिल्हा कांग्रेस सेवादल चे सरचिटणीस अब्दुल राजिक शेख , सामाजिक कार्यकर्त सुरज गुल्हाने व महेश चौधरी यांनी दिले होते. परंतु आज पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी नगर परिषद ने आजपर्यंत तरी काहीही कार्यवाही केलेली नाही. 
     त्यामुळे नागरिकांना, रुग्णालयातील रुग्णांना पावसाळ्यात नालीतील घाण पाण्यामुळे होणारा त्रास व धोका लक्षात घेऊन नवे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर साहेब ह्यांना भेटुन पुनश्च एकदा रामासावजी चौकात धापा टाकण्या संबंधीचे निवेदन देऊन काम त्वरीत सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. ह्यावर मुख्याधिकारी यांनी आपण नुकताच पदभार ग्रहण केल्या असल्याने लवकरच आपल्या मागणीची दखल घेतल्या जाईल असे आश्वासन या निवेदन कर्त्यांना दिले आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.