Header Ads

washim corona news दि.२२ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज २० कोरोना बाधीत निष्पन्न : २७ डिस्जार्च : एकूण संख्या ४३२

दि.२२ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज २० कोरोना बाधीत निष्पन्न : २७ डिस्जार्च 

कोरोना रुग्णांची एकूण संख्या पोहोचली ४३२ वर 

     कारंजा (जनता परिषद) दि.२२ - आज वाशिम जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ तर संध्याकाळी १२ कोरोना बाधीत निष्पन्न झाल्याने एकूण बाधीतांची संख्या ही २० झाल्याने जिल्ह्यातील आजपर्यंतची एकूण कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या ही ४३२ वर पोहोचली आहे.  तर आज बरे झाल्याने २७ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला. 

आज दुपारी प्राप्त १२.०० वाजता प्राप्त वृत्तानुसार ८ व्यक्ती पॉझिटिव्ह 

     काल रात्री उशिरा ४७ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये वाशिम शहरातील चांडक ले-आऊट परिसरातील ४७ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुष, कळंबा महाली (ता. वाशिम) येथील ३६ वर्षीय पुरुष, नांदगाव (ता. मंगरूळपीर) येथील ४० व ३० वर्षीय महिला, शेलूबाजार (ता. मंगरूळपीर) येथील ६७ वर्षीय पुरुष, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १३ वर्षीय मुलगी व ३० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

संध्याकाळी प्राप्त वृत्तानुसार, १२ व्यक्ती पॉझिटिव्ह 

     आज दुपारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये वाशिम शहरातील नवोदय विद्यालय परिसरातील ३० वर्षीय पुरुष, कारंजा लाड शहरातील शांती नगर परिसरातील ३० वर्षीय महिला, वापटी-कुपटी (ता. कारंजा लाड) येथील ३२ वर्षीय पुरुष, मालेगाव शहरातील गांधी नगर परिसरातील ३२ वर्षीय महिला व १० वर्षीय मुलगा, नांदगाव (ता. मंगरूळपीर) येथील २२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्याबाहेर ५ रुग्णांची वाढ झाली असून त्याची नोंदही आज घेण्यात येत आहे.
     तर आज सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील ४७ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बरे झालेल्या २७ व्यक्तींना दिला डिस्जार्च 
     दरम्यान, वाशिम तालुक्यातील ६, मंगरूळपीर तालुक्यातील ६, कारंजा लाड तालुक्यातील १ आणि रिसोड तालुक्यातील १४ व्यक्तींना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती :   एकूण पॉझिटिव्ह  ४३२     ऍक्टिव्ह  १८८
         डिस्चार्ज  २३५           मृत्यू  ९
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)


No comments

Powered by Blogger.