Header Ads

News Karanja - कारंजा शहरातील कोरोना योद्धांचा सन्मान : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कारंजा जिल्हा वाशिम ने केला सन्मान

Karanja lad sdm Rahul Jadhav

कारंजा शहरातील कोरोना योद्धांचा सन्मान

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कारंजा जिल्हा वाशिम ने केला सन्मान 

       कारंजा (का.प्र.) दि.२२ - कोरोनाचे काळात आपल्या कुटुबांची व जिवाची पर्वा न करता ज्या अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोनाचा प्रादुभाव रोखण्यासाठी कार्य केले अशा अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स तसेच सामाजीक संस्था व व्यक्ती यांना मानवंदन म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, वाशिम शाखा कारंजा यांचे वतीने कारोना योद्धा हे प्रमाणपत्र देवून त्यांचे कार्याचा गौरव करण्यात आले. 


कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, तहसिलदार धिरज मांजरे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतिश पाटील,  नगर परिषदचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, नायब तहसिलदार विनोद हरणे,  आरोग्य निरिक्षक विनय वानखडे व त्यांचे सहकारी यांना त्यांचे कर्तव्य बजावल्याबाबत गौरान्वित करण्यात आले. 


     कोरोनाची भिती न बाळगता रुग्णांना सेवा देणार्‍या शहरातील डॉक्टर अजय कांत, डॉ. प्रदीप धोपे, डॉ. राम गुंजाटे, डॉ. रश्मी गुंजाटे, डॉ. नवल सारडा, डॉ. यशवंत टेकाडे,  डॉ. उत्तम तपासे, डॉ. शंकर नांदे,  डॉ. किरण जाधव,  डॉ.आशिफ आकबानी यांनाही गौरविण्यात आले. 

कोरोनाचे काळात गरीबांना अन्न धान्य व जेवण देणारे गुरुमंदीर संस्थान, ध्यास संस्था, जिजाऊ बचत गट तसेच महेश चौधरी, रवि घाटे या कोरोना योद्धाचाही गौरव करण्यात आला. 
महाराष्ट्र राज्य  मराठी पञकार संघ वाशीम शाखा कारंजा तर्फे वाशीम जिल्हा अध्यक्ष सुनील फुलारी कारंजा तालुका अध्यक्ष कीरण क्षार उपाध्यक्ष दिलीप पाटील रोकडे  सचिव रामदास मिसाळ, विलास राउत, चॉंदभाई मुन्नीवाले, प्रकाश आडे यांचे हस्ते सन्मान पञ देउन गौवरण्यात आले. 


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.