Header Ads

राज्याचा बारावीचा निकाल ९०.६६% कोकण सर्वाधीक तर औरंगाबाद सर्वात कमी : अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा प्रथम

राज्याचा बारावीचा निकाल ९०.६६%

कोकण सर्वाधीक तर औरंगाबाद सर्वात कमी 

अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा प्रथम तर अमरावती जिल्हा सर्वात कमी 

कारंजा (जनता परिषद) दि.१६ - आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्यात बारावीचा  एकंदरीत निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभागाने सरशी केली असून निकाल ९५.८९ टक्के इतका लागला आहे तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा ८८.१८ टक्के इतका लागला आहे. 
परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोककण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएसची व्होकेशनल या शाखांमधील एकूण १४,२०,५७५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१३,६८७ विद्यार्थी परीक्षेला बसलेत व त्यापैकी १२,८१,७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९०.६६ टक्के आहे.

अमरावती विभागात बुलढाणा सर्वाधीक तर अमरावतीचा सर्वात कमी निकाल 

    अमरावती विभागातील एकुण १,४२,१९१ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी आवेदन केेले होते. यापैकी १,४१,६०२ विद्यार्थी परिक्षेस हजर राहीले. एकुण १,३०,४०९ विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण झाले असून यांची टक्केवारी ही ९२.०९%इतकी आहे. 
अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्याचा सर्वाधीक ९४.२४% निकाल लागला असून सर्वात कमी निकाल हा अमरावती जिल्ह्याचा ९०.३३% इतका लागला आहे. 
इतर जिल्ह्यांची टक्केवारी ही पुढील प्रमाणे आहे. १) बुलढाणा - ९४.२४% २) वाशिम - ९४.०७% ३) यवतमाळ-९१.८३% ४) अकोला - ९०.८३% तर ५) अमरावती - ९०.३३% असा निकाल लागला आहे. 

जिल्हा विद्यार्थी परिक्षार्थी डिस्टींक  ग्रेड १ ग्रेड २  पास उत्तीर्ण    टक्केवारी 
अकोला       २५३२२ - २५२४६ - ३४१० - ९२१४  -   ९६३२ -   ६७५ - २२९३१  - ९०.८३
अमरावती     ३५८२३ - ३५६५१ - २७२९ - १२६०१ - १५८२४- १०५० - ३२२०४ - ९०.३३
बुलढाणा       ३०८४३ - ३०७३७ - ४५७७ - १४७८१ - ९१९९    - ४११  - २८९६८   - ९४.२४
वाशिम      १८६३९ - १८५६३ - ३२५१ - ९२७५ - ४७५२ -  १८६  - १७४६४   - ९४.०७
यवतमाळ     ३१५६४ - ३१४०५ - २०५८  - १२५९३ - १३४२६ - ७६५  - २८८४२ -  ९१.८३
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विभाग     १४२१९१ - १४१६०२ -१६०२५ - ५८४६४ - ५२८३३ - ३०८७ -  १३०४०९ - ९२.०९

No comments

Powered by Blogger.