Header Ads

malegaon news - युवकाने केला मुख्याध्यापकावर गोळीबार; सुदैवाने प्राणहानी नाही - वाशिम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील ग्राम अमाणी येथील घटना

((चित्र १- आरोपीने गोळीबारात वापरलेली पिस्टल)     
(चित्र २- गोळी लागल्याने कपाटाला छेद)

युवकाने केला मुख्याध्यापकावर गोळीबार; सुदैवाने प्राणहानी नाही 

वाशिम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील ग्राम अमाणी येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना

हल्ला करणारा आरोपी अटकेत;  पिस्टल ही जप्त 

मालेगांव (जनता परिषद) दि.२४ - आज तालुक्यातील ग्राम अमाणी येथे मुख्याध्यापक यांचेवर एका व्यक्तीने गोळीबार केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या गोळीबारात प्राणहानी झाली नाही.
याबाबत मालेगांव पोलिस ने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० चे सुमारास जि.प.शाळा अमाणी येथे चंद्रकांत कानडे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक विजय तुळशीराम बोरकर, माजी मुख्याध्यापक गजानन इंगळे तसेच इतर शिक्षीका व शिक्षकांचे उपस्थितीत शाळेचे कामकाज करीत असतांना सदर ठिकाणी सुशांत समाधान खंडारे (वय २२ वर्ष) रा.अमाणी तेथे आले. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व इतर शिक्षकांना तुम्ही काहीच शिकवत नाही तसेच इंगळे यांना मुख्याध्यापक या पदावरुन का काढले असे बोलून मुख्याध्यापक बोरकर यांच्या दिशेने गावठी पिस्टलने गोळीबार केला. गोळी मुख्याध्यापकाला न लागता निशाणा चुकून मुख्याध्यापकाचे पाठीमागे असलेल्या लोखंडी कपाटाला लागली. या गोळीबारामुळे सर्व शिक्षक भयभीत होऊन आरडोओरड करु लागताच आरोपीने जवळचे पिस्टल शाळेतच फेकून पळून गेला. 
या घटनेची माहिती प्राप्त होताच, मालेगांवचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळ गाठले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी सह अप्पर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलिस अधिक्षक पवन बनसोड यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावर फॉरेंसिक युनिट व शॉनपथक ही पाचारण करण्यात आले. तसेच जिल्ह्याची नाकाबंदी ही करण्यात आली. 
आरोपीने शाळेमध्ये गोळीबार करुन गुन्ह्यात वापरलेले पिस्टल पोलिसांनी जप्त केेले असून  आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याचेकडील आणखी एक शस्त्र त्याने अमाणी येथील शेतशिवारातील नाल्याचे पाण्यात फेकून दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस शोध घेत आहे. 
या घटनेची फियार्र्द मुख्याध्यापक विजय तुळशीराम बोरकर यांनी दिली असून गुन्हे दाखल करुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने हे करीत आहे. 


No comments

Powered by Blogger.