Header Ads

washim corona news - दि.२४ जुलै : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाशिम जिल्ह्याने आज गाठले अर्धशतक : एकूण ४८८


दि.२४ जुलै :  कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाशिम जिल्ह्याने आज गाठले अर्धशतक : एकूण ४८८ 

 सद्यस्थिती : एकूण पॉझिटिव्ह-४८८ ऍक्टिव्ह - २०३ डिस्चार्ज - २७६ मृत्यू - ९

    वाशिम (जनता परिषद) दि.२४ - आज रोजी वाशिम जिल्ह्यात दुपारी १० व संध्याकाळी प्राप्त माहितीनुसार ४० असे एकूण ५० व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकुण संख्या ही ४८८ वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात २९ जणांना डिस्जार्च देण्यात आला आहे. 

दुपारी १२.३० वाजेचे वृत्तानुसार १० पॉझिटिव्ह 

काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार कारंजा शहरातील इंगोले प्लॉट परिसरातील ५ व्यक्ती, शिक्षक कॉलनी परिसरातील १ व्यक्ती, आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १ व्यक्ती, नांदगाव (ता. मंगरूळपीर) येथील १ व्यक्ती, शेलूबाजार (ता. मंगरूळपीर) येथील १ व्यक्ती आणि वाशिम शहरातील विनायक नगर परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

संध्याकाळी ६.३० वाजेचे वृत्तानुसार ४० कोरोना बाधीत 

आज सायंकाळी प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील २३, मंगरूळपीर तालुक्यातील ३, रिसोड तालुक्यातील १३ आणि कारंजा लाड शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
वाशिम शहरातील हकीम अली नगर परिसरातील २, गंगू प्लॉट परिसरातील ५, सोफी नगर परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, जानकी नगर येथील ४, लाखाळा येथील ३  आणि सिंधी कॉलनी परिसरातील १ व्यक्ती तसेच कळंबा महाली येथील ६ व्यक्ती कोरोना बाधित आहेत.
मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी येथील १, नांदगाव येथील १, वनोजा येथील १ असे अशा एकूण ३ व्यक्ती कोरोना बाधित आहेत. रिसोड तालुक्यातील एकूण १३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये रिसोड शहरातील पठाणपुरा परिसरातील १, आसन गल्ली परिसरातील १ आणि मांगवाडी येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे. तसेच कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज २९ जणांना डिस्जार्च 

     जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २८ आणि जिल्ह्याबाहेर उपचार घेणार्‍या १ अशा एकूण २९ व्यक्तींना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील ०३, संभाजी नगर परिसरातील ०२, गवळीपुरा परिसरातील ०२, पंचशील नगर परिसरातील ०१, चिखली (ता. मंगरूळपीर) येथील ०६ व्यक्ती, वाशिम शहरातील गोटे कॉलेज परिसरातील ०२ व्यक्ती, रिसोड शहरातील इंदिरा नगर परिसरातील ०७, गजानन नगर परिसरातील ०१ व सिव्हील लाईन्स परिसरातील ०१, मांगवाडी येथील ०१, वनोजा (ता. रिसोड) येथील ०२ व्यक्तींचा आणि अकोला येथे उपचार घेणार्‍या वाशिम येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

No comments

Powered by Blogger.