Header Ads

कारंजा शहरात विनामास्क, वाहन नियमभंग व सोशियल डिस्टंसिंगचे भंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल

कारंजा शहरात विनामास्क, वाहन नियमभंग व सोशियल डिस्टंसिंगचे भंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल  

४३७ गुन्ह्यांसह २ लाख ५ हजार रुपयांचे दंड वसूल

नागरिकांनी कोरोना पासून स्वरक्षणार्थ व परिजणांचे संरक्षणसाठी नियमांचे पालन करावे - ठाणेदार पाटील यांचे आवाहन 

कारंजा (जनता परिषद) दि.११ - कारंजा शहरात कोव्हीड-१९ (कोरोना) संसर्ग साथ रोगाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने विनामास्क फिरणारे, डबलसिट, ट्रिपल सिट प्रवास करणारे तसेच सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करणारे व्यवसाईक व नागरिक यांच्यावर कारंजा शहर पोलिस स्टेशनचे वतीेने कारवाई करण्यात येत आहे. 
उपरोक्त नियमांचे पालन न करणारे नागरिक यांचेवर दंडात्मक कार्यवाही करुन २ लाख ०५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच वाहन चालकांविरोेधातही भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार ४३७ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. 
कारंजा शहरात ४ कन्टेंन्मेंट झोन असून कोरोना रोगाचा संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक कामा खेरीज घराबाहेर निघू नये. सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा. दुचाकी वाहन चालकांनी डबल सिट, ट्रिपल सिट गाडीवर प्रवास करु नये, ऍटो व कार चालकांनी दोन प्रवाशांपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करु नये, व्यवसाईकांनी त्यांचे प्रतिष्ठाणापुढे सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे असे आवाहन कारंजा शहर पोलिस स्टेशनचे वतीने पोलिस निरीक्षक सतीश पाटील यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.