Header Ads

काल दि.१० जुलै रोजी कारंजात एकुण ११ पॉझिटिव्ह : रॅपीड टेस्ट मध्ये ५ पॉझिटिव्ह


काल दि.१० जुलै रोजी कारंजात एकुण ११ पॉझिटिव्ह : रॅपीड टेस्ट मध्ये ५ पॉझिटिव्ह 

नागरिकांनी सुचनांचे पालन करावे व स्वत:चा बचाव करावा 

कारंजा (जनता परिषद) दि.११ - काल दि.१० जुलै शहरात सकाळी जिल्ह्याचे रिपोर्ट मध्ये ३ व अमरावती येथे १ असे एकुण ४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर तालुका आरोग्य यंत्रणेने कंटेन्मेंट झोन व बाधीत असलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींच्या  रॅपीड अँटीजन टेस्टींग करण्यात आल्यात. यामध्ये ५ व्यक्ती ह्या पॉझिटिव्ह म्हणून आल्यात. तर कालच रात्री उशीरा प्राप्त अहवालांमध्ये शहरातील माळीपुरा व तालुक्यातील कामरगांव येथील एक व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आज सकाळी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यामुळे काल दि. १० जुलाई रोजी एकाच दिवसात शहरातील ११ व्यक्ति कोरोना विषाणु चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

शहरात रॅपीड अँटीजन टेस्टींग ला सुरुवात : काल ५ पॉझिटिव्ह 

कोरोना विषाणूचा जास्त फैैलाव होऊ नये, कोरोना चाचणी संदर्भातील अहवाल लवकर प्राप्त व्हावेत यासाठी केंद्र व राज्य शासनाने रॅपीड अँटीजन टेस्टींगची सुरुवात केलेली आहे. यामुळे लवकर निदान लागून त्यादृष्टीने खबरदारीचे उपाय घेणे योग्य होईल. कारंजा तालुक्याला या टेस्टींगसाठी  १०० किट प्राप्त झाल्या आहेत. या टेस्टींगमुळे लवकर निदान लागणार असल्यामुळे ह्या रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होईल. 
काल रोजी करण्यात आलेल्या टेस्टींग मध्ये  सिंधी कॅम्प परिसरातील सकाळचे बाधीत रुग्णाचे संपर्कातील ३ व्यक्ती, आनंदनगर येथील बाधीत रुग्णाचे संपर्कातील १ व्यक्ती तर काजीपुरा येथील बाधीत रुग्णाचे संपर्कातील १ व्यक्ती पॉझिटिव्ह म्हणून नोंद करण्यात आले आहेत. 
नागरिकांनी सुरक्षेचे दृष्टीने प्रशासनाने व आरोग्य विभागाने दिलेले सुचनांचे पालन करावे, नियमीत बाहेर पडल्यावर मास्कचा वापर करावा, सोशियल डिस्टेंसिंगचे पालन करावे, अनावश्यक गर्दी टाळावी, मुक्त संचार करु नये, खोकलतांना व शिंकतांना तोंडावर रुमाल ठेवावा. 

No comments

Powered by Blogger.