Header Ads

Maharashtra HSSC Result 2020 : बारावीचा निकाल उद्या लागणार : न्यूजमधील साईटवर क्लिक करुन पाहता येईल

Maharashtra HSSC Result 2020

बारावीचा निकाल उद्या लागणार 

न्यूजमधील साईटवर क्लिक करुन पाहता येईल 

मुंबई (जनता परिषद) दि.१५ - फेबु्रवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमीक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी चे परिक्षेचा निकाल उद्या दि.१६ जुलै रोजी दुपारी १.०० वाजता लागणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वीतने देण्यात आलेली आहे. 
मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाचे वतीने घेण्यात आलेल्या बारावीचे परिक्षांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळांवर करण्यात येणार आहे. 

खालील संकेतस्थळांवर क्लिक करुन निकाल पाहता येईल.

↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓


गुणपत्रीकेची प्रिट खालील लिंक/साईट वरुन काढता येईल.  

                         ↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓

                    www.mahresult.nic.in 

       या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना गुणपत्रीकेची प्रिटही घेता येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. 


 www.mahahsscboard.in 
       या संकेतस्थळा वर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रीत निकाल उपलब्ध होईल. 

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसर्‍या दिवसापासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रत, पुनर्मुल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र साठी संबंधीत विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पदधतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वत: किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परिक्षेपासून करुन देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी अर्ज १७ जुलै २०२० ते २७ जुलै २०२० पर्यंत व छायाप्रतिसाठी १७ जुलै २०२० ते ०५ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. तसेच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल. 

1 comment:

Powered by Blogger.