Header Ads

दि.१६ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज १६ व्यक्ती कोरोना बाधीत : ५ जणांना डिस्जार्च

दि.१६ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज १६ व्यक्ती कोरोना बाधीत : ५ जणांना डिस्जार्च  

     कारंजा (जनता परिषद) दि.१६ - आज वाशिम जिल्ह्यात संध्याकाळी प्राप्त माहितीनुसार १५ तर दुपारी आलेले माहितीनुसार १ असे एकुण १६ व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
संध्याकाळी प्राप्त माहितीनुसार, मंगरूळपीर तालुक्यातील ७, कारंजा लाड येथील ५, मालेगाव तालुक्यातील २ व वाशिम तालुक्यातील १ अशा एकूण १५ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
वाशिम शहरातील फकीरपुरा परिसरातील १, पांगरीकुटे (ता. मालेगाव) येथील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १ कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. मंगरूळपीर शहरातील बाधित व्यक्तींमध्ये बढाईपुरा परिसरातील ५, पठाणपुरा परिसरातील १ व श्रीराम नगर परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.
कारंजा लाड शहरातील आदर्श कॉलनी येथील १, सहारा कॉलनी येथील १, इंदिरा नगर १, शिक्षक कॉलनी १ व पोलीस क्वार्टर परिसरातील १ अशा एकूण ५ व्यक्तींना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे.

दुपारी प्राप्त माहितीनुसार, काल रात्री उशिरा ७३ अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ७२ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल निगेटिव्ह आहेत. तर १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर व्यक्ती ब्राह्मणवाडा (ता. वाशिम) येथील रहिवासी असून यापूर्वीच्या बाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहे.
दरम्यान, ५ व्यक्तींना उपचारानंतर आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये वाशिम शहरातील काळे फाईल येथील १, गवळीपुरा येथील २, विनायक नगर येथील १ व आसन गल्ली, रिसोड येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.

*एकूण पॉजिटिव : ३०९  * उपचार घेत असलेले (एक्टिव ) : १८२
* बरे झालेले : १२०



No comments

Powered by Blogger.