Header Ads

दि.१५ जुलै : आज वाशिम जिल्ह्यातील १९ व्यक्ती पॉझिटिव्ह : एकुण संख्या २९३ वर

washim corona news janta parishad

दि.१५ जुलै : आज वाशिम जिल्ह्यातील १९ व्यक्ती पॉझिटिव्ह : एकुण संख्या २९३ वर

आज रिसोड तालुक्यात कोरोनाचा स्फोट : १२ पॉझिटिव्ह 

वाशिम (जनता परिषद) दि.१५ - आज वाशिम जिल्ह्यात जिल्ह्यातील तसेच जिल्हाबाहेरील असे एकुण १९ जिल्हावासीय हे कोरोना चाचणी अहवालात पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या ही २९३ वर पोहोचली आहे. 

रिसोड तालुक्यात कोरोनाचा स्फोट : १२ पॉझिटिव्ह

जिल्हा प्रशासनाने दुपारी १.३० वाजता दिलेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील १२ व्यक्ती ह्या पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा स्फोट दिसून आला तसेच प्रशासनाने केलेले संपूर्ण लॉकडाऊन योग्यच हे ही अधोरेखीत झाले. यामध्ये रिसोड शहरातील इंदिरा नगर परिसरातील ७, गजानन नगर परिसरातील १, सिव्हील लाईन परिसरातील १, मांगवाडी येथील १ व तालुक्यातील ग्राम वनोजा येथील २ व्यक्तींचा यांत समावेश आहे. 

जिल्हाबाहेर ४ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह 

वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात दाखल असलेल्या ०४ व्यक्तींचे अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आलेेत. यामध्ये मंगरूळपीर शहरातील दिवाणपुरा परिसरातील ०१ आणि उंबर्डाबाजार (ता. कारंजा लाड) येथील प्रत्येकी व्यक्तीचा समावेश असून हे दोघेही वर्धा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत आहेत. तसेच अकोला व नाशिक येथे उपचार घेणार्‍या वाशिम शहरातील दोन व्यक्तींचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

मंगरुळपीर शहरात १ पॉझिटिव्ह 

जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी ६.०० वाजता दिलेल्या माहितीनुसार, ३५ अहवाल प्राप्त झालेत व यांतील ३२ हे निगेटिव्ह आले आहेत. ३ व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्या आहेत. यामध्ये मंगरुळपीर शहरातील १ तर कारंजा तालुक्यातील २ व्यक्तींचा समावेश आहे. मंगरुळपीर येथील पठाणपुरा येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असून तो यापुर्वीच्या कोरानाबाधीताच्या संपर्कातील आहे. 

कारंजा तालुक्यातील ३ व्यक्ती पॉझिटिव्ह 

कारंजा शहरातील गायत्री नगर परिसरातील एक व्यक्ती व तालुक्यातील ग्राम शिवनगर येथील एक व्यक्ती असे दोन व्यक्तीही कोरोना बाधीत आले आहेत. तर वर्धा येथे उपचार घेत असलेले तालुक्यातील ग्राम उंबर्डा बाजार येथील एक व्यक्ती असे ३ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

बरे झाल्याने आज जिल्ह्यातील ३ व्यक्ती डिस्जार्च 

दरम्यान आज रिसोड तालुक्यातील भापूर येथील एका महिलेला उपचारानंतर बरे झाल्याने आाज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच पुणे व औरंगाबाद येथे उपचार घेत असलेल्यांपैकी प्रत्येकी १-१ व्यक्तींनाही रुग्णालयाने डिस्जार्च दिला आहे. 
सद्यस्थिती :-----   एकूण पॉझिटिव्ह -२९३ :  उपचार घेत असलेले (ऍक्टिव्ह) -१७१  
                                     बरे झालेले (डिस्चार्ज) - ११५ तर मृत्यू - ०७

No comments

Powered by Blogger.