Header Ads

26 July : Kargil Vijay Diwas Kargil war kargil din

kargil war kargil vijay diwas kargil vijay din 26 july today कारगील विजय दिवस

२६ जुलै: आज कारगील विजय दिवस 

26 July : Kargil Vijay Diwas

भारतमातेच्या सुपुत्रांना विनम्र अभिवादन !

आमचे २१ वर्षापुर्वी म्हणजेच १९९९ च्या हिवाळ्यातील संधी साधून पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू-काश्मीरच्या कारगिल सह आणखी काही शिखरांवर अवैद्य कब्जा केला आणि पाठीत खंजीर खुपसण्याच्या पाकिस्तानच्या परंपरेचा पुन्हा एकदा जीवंत उदाहारण जगासमोर ठेवला. एप्रिलच्या उत्तरार्धात आणि मेच्या सुरूवातीच्या काळात या शिखरांवरील बर्फ वितळला तेव्हा भारत सरकारला पाकिस्तानच्या घुसखोरीविषयी कळले. आमच्या सैन्याने पाकिस्तानला येथून हाकलण्यासाठी ५ मे ते २६ जुलै या कालावधीत काश्मीरच्या शिखरावर शत्रूशी यशस्वी लढा दिला.

26 July : Kargil Vijay Diwas

     या भ्याड कृत्याला उत्तर देत आजचेच या दिवशी, २६ जुलै, १९९९ रोजी, भारताच्या शूर सैनिकांनी पाकिस्तानच्या सैन्याला हुसकावून लावत कारगिल युद्ध Kargil war जिंकला. त्यानंतर दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल हा विजय दिन म्हणून साजरा केला जात होता. हा दिवस भारतीय सैन्याच्या जांबाजीसाठी नेहमीच लक्षात राहील.

         हे इतके कठीण युद्ध होते की रात्रं-दिवस आमचे जवान शत्रूंसोबत लढा देत राहिले. शत्रू वरच्या डोंगरावर आणि खाली आमचे शूर सैनिक होते. अशा परिस्थितीत आमच्या शूर सैनिकांनी विजय अशक्य दिसणार्‍या युद्धात पराक्रमाची पराकाष्ठा करीत विजयश्री खेचून आणला. देशाच्या शूरवीरांना त्यांच्या अदम्य धैर्याने शत्रूला कारगिलच्या दुर्गम डोंगरातून हाकलून दिले आणि पुन्हा तिथे तिरंगा फडकाविला. आपण या दिवशी आपल्या मित्रांना आणि परिवारासही स्मरण करून त्या शूर माणसांच्या कथांची आठवण करून दिली पाहिजे.

कारगिलच्या विजय गाथाची आठवण आज देशातील प्रत्येक नागरिकाचे मन प्रचंड अभिमानाने भरुन येते आहे. जम्मू-काश्मीरमधील कारगिल, द्रास आणि बटालिकच्या शिखरावर कब्जा करण्याचा शत्रूचा वाईट हेतू होता. भारताच्या शूर सैनिकांनी आपले बलिदान देऊन या शिखरांचे संरक्षण केले आणि पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. भारतीय सैन्य दलाच्या या सैनिकांच्या अतुलनीय शौर्य, धैर्य व त्याग लक्षात ठेवण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी देश दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिन साजरा करतो.  कारगिल विजय दिन हा भारताचा स्वाभिमान, आश्चर्यकारक पराक्रम आणि स्थिर नेतृत्व यांचे प्रतीक आहे.  मातृभूमीच्या रक्षणासाठी समर्पित असलेल्या भारतीय वीरांचा देशाला अभिमान आहे.

 भारतमातेच्या रक्षणार्थ सदैव सज्ज असलेल्या तसेच सर्वोच्च बलीदान दिलेल्या सर्वच भारतमातेच्या सुपुत्रांना या शौर्य व Kargil vijay diwas बलीदानचे दिवशी जनता परिषद परिवाराचे वतीेने तसेच समस्त भारतीयांच्या वतीने नमन व अभिवादन ! 

No comments

Powered by Blogger.