Header Ads

washim news - PM pik vima yojana portal

PM pik vima yojana washim news

प्रधानमंत्री पिक विमा योजना पोर्टलवर वाशिम जिल्ह्यातील सर्व गावांची नावे उपलब्ध

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

     वाशिम, दि. २६ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवर तांत्रिक कारणांमुळे जिल्ह्यातील काही महसुली गावातील भाग उपलब्ध होत नसल्याने सातबारा तपासणी होत नव्हती. शासनाने २५ जुलै रोजी विमा पोर्टलवर दुरुस्ती करून सर्व गावांची नावे व त्यामधील भाग-१, २, ३ उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे या गावांमधील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा हप्ता भरून पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

      जिल्ह्यातील काही महसुली गावांमधील काही तलाठी सज्जातील भाग-१, २ व ३ तांत्रिक अडचणीमुळे विमा पोर्टलवर दिसत नव्हते. मात्र आता ही सर्व गावे पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये वाशिम तालुक्यातील भाग-३, मालेगाव तालुक्यातील मारसूळ भाग-१ व भाग-२, मेडशी भाग-१ व भाग-२, शिरपूर भाग-१, भाग-२ व भाग-३, मुंगळा भाग-१ व भाग-२, रिसोड तालुक्यातील रिसोड भाग-१, भाग-२ व भाग-३, गोवर्धन भाग-१ व भाग-२, व्याड भाग-१ व भाग-२, मानोरा तालुक्यातील फुलउमरी भाग-१ व भाग-२, गिरोली भाग-१ व भाग-२, मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा भाग-१ व भाग-२ तसेच कारंजा लाड तालुक्यातील मनभा भाग-१ व भाग-२ या गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी नजीकच्या महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्र अथवा बँकेत विमा प्रस्ताव व विमा हप्ता भरून योजनेत सहभागी होण्याचे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र व सामुहिक सुविधा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

     प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी वाशिम तालुका विमा प्रतिनिधी गजानन शिंदे (भ्रमणध्वनी क्र. ७४९९२७३१५३), रिसोड तालुका प्रतिनिधी निलेश गरड (भ्रमणध्वनी क्र. ९५४५४२५८७०), मालेगाव तालुका प्रतिनिधी महादेव जगताप (भ्रमणध्वनी क्र. ७०८३५३०३८३), मंगरूळपीर अर्जुन पवार (भ्रमणध्वनी क्र. ७०३८७००४४९), मानोरा तालुका प्रतिनिधी भूषण लाहे (भ्रमणध्वनी क्र. ८४५९८४४३१५), कारंजा लाड तालुका प्रतिनिधी मंगेश घुले (भ्रमणध्वनी क्र. ९७६७३५९९०९) यांच्याशी तसेच तालुका कृषि अधिकारी, क्षेत्रीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे.

३१ जुलैपूर्वी विमा हप्ता भरा

       प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत असून त्याला शासनस्तरावरून मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर नजीकच्या महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्र अथवा बँक शाखेत आपले विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावर यांनी केले आहे.

2 comments:

  1. PMFBY MADHYE JYANCHE SAVINGS ACCOUNT SBINTOUCH BRANCH WASHIM IFSC CODE SBIN0019240 SEARCH HOAT NAHI TYAMULE SADAR FARMERS PIK VIMA PREMIUM BHARANE KARITA ADCHAN NIRMAAN ZALI AAHE SADAR VISHAY KRUSHI ADHIKARI AND COLLECTOR HYANI LAKSH DEVUN UPDATE KARANE KARITA VINANTI - WALAYATALI 9850481749

    ReplyDelete
  2. SIR KRUSHI ADHIKARI TOTAWAR SAHEB HYANCHA MOBILE NO ADD KELA ASATA TAR IMP IMPLEMENTING SUBJECTS AND PROBLEM OF FARMERS 31 JULY CHYA AGODAR INFORM KARATA AALYAA ASATA MHNJE PIK VIMA PREMIUM BHARANE KARITA ADCHAN N YETA 31 JULY 2020 PARYANT VIMA PRASTAV SUBMISSION ZAALE ASATE

    ReplyDelete

Powered by Blogger.