Header Ads

washim corona news today : दि.२३ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज ५ कोरोना बाधीत निष्पन्न; एकुण संख्या ४३८ वर : १२ डिस्जार्च

दि.२३ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज ५ कोरोना बाधीत निष्पन्न; एकुण संख्या ४३८ वर  
आज बरे झालेल्या १२ जणांना डिस्जार्च 

कारंजा (जनता परिषद) दि.२३ - आज वाशिम जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १ तर संध्याकाळी ४ कोरोना बाधीत निष्पन्न झाल्याने एकूण बाधीतांची संख्या ही ५ झाल्याने जिल्ह्यातील आजपर्यंतची एकूण कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या ही ४३८ वर पोहोचली आहे.  तर आज बरे झाल्याने १२ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला. 

आज दुपारी प्राप्त १२.३० वाजता प्राप्त वृत्तानुसार १ व्यक्ती पॉझिटिव्ह 

काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील ध्रुव चौक परिसरातील २८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

संध्याकाळी ७.०० वाजता प्राप्त वृत्तानुसार, ४ व्यक्ती पॉझिटिव्ह 

आज सायंकाळी प्राप्त अहवालानुसार वाशिम येथील सिव्हील लाईन्स परिसरातील ३० वर्षीय पुरुष आणि राहुल पार्क, सोमठाणा (ता. मानोरा) येथील ३३ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील आणखी २ व्यक्ती अकोला येथे कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.

बरे झालेल्या १२ व्यक्तींना दिला डिस्जार्च 

     दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२ व्यक्तींना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील ३, मालेगाव तालुक्यातील ३ आणि वाशिम तालुक्यातील ६ व्यक्तींचा समावेश आहे.

सद्यस्थिती :   एकूण पॉझिटिव्ह  ४३८     ऍक्टिव्ह  १८२
        डिस्चार्ज  २४७         मृत्यू  ९
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.