Header Ads

washim news - जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या सामाजिक जाणीवेतून वृक्षरोपण व संवर्धनाचा ध्यास

washim sp police plantation

जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या सामाजिक जाणीवेतून वृक्षरोपण व संवर्धनाचा ध्यास 

जिल्हाधिकारी, सिईओ व अधिक्षक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न 

वाशिम (जनता परिषद) दि.२३ - वाशिम जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्विकारल्यानंतर पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी नवनविन संकल्पनेच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीरित्या अंमलबजावणी केली. तसेच त्यांनी विविध समाजोपयोगी संकल्पनांची सुद्धा अंमलबजावणी केली. 
     त्याचाच एक भाग म्हणून सध्या पावसाळ्याचे दिवस चालु आहेत. या दिवसांमध्ये झाडांची लागवड केल्यास ते चांगल्याप्रकारे वाढतात व त्याद्वारे पर्यावरणाचे संतूलन सुद्धा राखले जाते. या संकल्पनेतून काल दिनांक २२ जुलै नविन पोलिस मुख्यालय वाशिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास वाशिम जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मिणा, जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी, अपर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण, पोलिस निरीक्षक श्रीराम घुगे, उदय सोयस्कर, रापोनि संजय क्षिरसागर व इतर पोलिस अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थितीत नविन पोलिस मुख्यालय येथील जिल्हा पोलिस दल कवायत मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. 
जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यावेळी म्हणाले की, वृक्षरोपण करणे व संवर्धन करणे हे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजले पाहिजे. अन्यथा करण्यात येणार्‍या वृक्षारोपणाचा काहीच फायदा होणार नाही. पोलिस दलातील कर्मचार्‍यांनी आंवर्जुन पुढाकार घेत एका व्यक्तीने किमान ५ झाडे जोपासण्याची जबाबदारी स्विकारावी, असे आवाहन केलेे.  त्यांनी केलेल्या वृक्षारोपणात आवळा, चिंच व सागवान या जातीच्या वृक्षांची निवड केली जेणे करुन भविष्यात ही झाडे मोठी झाल्यावर त्याचा फायदा सर्वांना होईल. सदर कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. 

No comments

Powered by Blogger.