Header Ads

दि.१७ जुलै : आज वाशिम जिल्ह्यात ३१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह : पुर्वीच तब्बेत खालावलेल्या शिरपूर येथील कोरोना बाधीत व्यक्तीचा मृत्यू news washim

दि.१७ जुलै : आज वाशिम जिल्ह्यात ३१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह 

पुर्वीच तब्बेत खालावलेल्या शिरपूर येथील कोरोना बाधीत व्यक्तीचा मृत्यू 

कारंजा (जनता परिषद) दि.१७ - आज दिनांक १७ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाचे माहितीनुसार,  दुपारी १२.०० वाजता ८ रुग्ण, संध्याकाळी ७.०० वाजता १६ रुग्ण  व त्यानंतर रात्री ८.३० वाजता आलेल्या ७ रुग्ण असे एकुण ३१ व्यक्ती कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहेत. यांतील काही चाचण्या ह्या लॅब द्वारे तर काही चाचण्या ह्या रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे करण्यात आलेल्या आहेत.  

दुपारी १२ वाजता प्राप्त माहितीनुसार, ८ व्यक्ती बाधीत 

जिल्हा प्रशासनाने आज दुपारी १२ वाजता दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा रिसोड तालुक्यातील ८ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील ०३, गजानन नगर परिसरातील ०३, मांगवाडी येथील ०१ आणि वनोजा (ता. रिसोड) येथील ०१ व्यक्तीचा समावेश आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत.

बरे झालेल्या १५ जणांना आज डिस्चार्ज 

      दरम्यान, वाशिम शहरातील गवळीपुरा परिसरातील ७, मोठा गवळीपुरा येथील १, हकीमअली नगर येथील ३, गंगू प्लॉट येथील २, मंगरूळपीर शहरातील मदार तकिया, माळीपुरा येथील १ आणि चौसाळा (ता. मानोरा) येथील १ अशा एकूण १५ व्यक्तींना उपचारा नंतर आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

संध्याकाळी ७.०० वाजता प्राप्त महितीनुसार, १६ व्यक्ती पॉझिटिव्ह 

   मंगरूळपीर कोविड केअर सेंटर येथे आज झालेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये एकूण ११ व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. यापैकी १० व्यक्ती कारंजा लाड येथील बाधितांच्या संपर्कातील आहेत.
    यवतमाळ वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविलेले ५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मंगरूळपीर शहरातील पठाणपुरा येथील २ आणि कारंजा लाड शहरातील गायत्री नगर येथील १, जिजामाता चौक परिसरातील १ व चुना पुरा परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.

रात्री  ८.३० वाजता प्राप्त माहितीनुसार, ७ व्यक्ती पॉझिटिव्ह 

आज रात्री आणखी ७ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये वाशिम तालुक्यातील ४ व रिसोड तालुक्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.
      वाशिम शहरातील नवीन आययुडीपी परिसरातील १ आणि तोंडगाव (ता. वाशिम) येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच रिसोड शहरातील इंदिरा नगर येथील १, मांगवाडी येथील १ आणि वनोजा (ता. रिसोड) येथील १ व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे.

आधिच तब्बेत खालावलेल्या कोरोना बाधीत व्यक्तीचा शिरपुर येथे मृत्यू 

      दरम्यान, काल, १६ जुलै रोजी अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये कोरोना बाधित असल्याचे निदान झालेल्या शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील व्यक्तीचा आज दुपारी जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. सदर व्यक्तीला १६ जुलै रोजी सकाळी ११ वा. दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची तब्येत पूर्णतः खालावलेली होती. अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये त्याला कोरोना विषाणू संसर्गाचे निदान झाले.  सदर व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. सदर व्यक्तीला अगोदरपासूनच किडनीचा आजार होता, त्याची किडनी निकामी झाली होती. तसेच त्याला रक्तदाब सुद्धा होता. उपचारा दरम्यान आज, १७ जुलै रोजी दुपारी ३ वा. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. News washim
Washim Corona News

No comments

Powered by Blogger.