Header Ads

मजुरांच्या मागणीनुसार मिळणार रोजगार



मजुरांच्या मागणीनुसार मिळणार रोजगार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून

 ग्रामपंचायत अथवा तालुका स्तरावर रोजगाराची मागणी नोंदवा



वाशिम, दि. ०२ (जिमाका) : जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर रोजगाराची मागणी केलेल्या मजुरांना त्यांच्या गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. सद्यस्थितीत परराज्यातून व परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मजूर परतले आहेत. या मजुरांना तसेच स्थानिक मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वच तालुक्यात मजुरांसाठी मागणीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून काम उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच सर्व संबंधितांनी ग्रामपंचायतीमध्ये मजुरांच्या मागणीनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ लक्ष ५९ हजार ५८२ मजूर क्षमता असलेली एकूण ४ हजार १२९ कामे शेल्फवर उपलब्ध आहेत. यामध्ये कारंजा तालुक्यातील ९९३, मालेगाव तालुक्यातील ६५१, मंगरूळपीर तालुक्यातील ३१७, मानोरा तालुक्यातील ६६०, रिसोड तालुक्यातील १२९१ व वाशिम तालुक्यातील २१७ कामांचा समावेश आहे. सद्यस्थितीत कारंजा तालुक्यात १ हजार ५०८, मालेगाव तालुक्यात २ हजार ३१६, मंगरूळपीर तालुक्यात १ हजार २१४, मानोरा तालुक्यात १ हजार ५८०, रिसोड तालुक्यात २ हजार २२ आणि वाशिम तालुक्यात १ हजार १०६ अशी जिल्ह्यात एकूण ९ हजार ७४६ कामे अपूर्ण असून या कामांवर सुद्धा मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन तालुका स्तरावरून करण्यात आले आहे. या अपूर्ण कामांमध्ये घरकुल, सिंचन विहिरी, फळबाग, वृक्ष लागवड, तुती लागवड, शौचालय बांधकाम, रस्ते, शोषखड्डे, शेततळे, रोपवाटिका, स्मशानभूमी, गोठा आणि इतर कामांचा समावेश आहे.

स्थलांतरित व स्थानिक मजुरांना पुरेशा प्रमाणात रोजगार मिळणार
सन २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायतनिहाय मंजूर कृती आराखड्यातील ४९ हजार ४५५ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सदर कामांना आवश्यकतेनुसार तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याचे सुध्दा नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेल्फवरील कामे, अपूर्ण कामे व सन २०२०-२१ मध्ये प्रस्तावित आराखड्यातील कामांमुळे जिल्ह्यातील स्थानिक व स्थलांतरित मजुरांना पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देता येणार आहे. जिल्ह्यात सध्या १९९ ग्रामपंचायतींमध्ये ५०८ कामे सुरु असून त्यावर ३ हजार ३४३ मजूर उपस्थित आहेत, असे उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी कळविले आहे.

कामाची मागणी अशी नोंदवा
जिल्ह्यात परतलेल्या मजुरांना व गावातील इतर मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांनी काम मागणीसाठी नमुना क्र. ४ मध्ये लेखी अर्ज ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक अथवा ग्राम रोजगारसेवक किंवा तहसील अथवा पंचायत समिती कार्यालयामध्ये देवून पोच घ्यावी. काम मागणी अर्जासोबत बँक पासबुक व आधारकार्डची छायांकित प्रत जोडावी. मजुरांनी काम मागणी केल्यानंतर १५ दिवसाच्या आत काम उपलब्ध करून देण्यात येईल. १५ दिवसंमध्ये काम उपलब्ध न झाल्यास बेरोजगार भत्ता देण्यात येईल. ज्या अकुशल मजूर कुटुंबांकडे जॉबकार्ड उपलब्ध नसेल, त्यांनी जॉबकार्डची मागणी ग्रामपंचायत अथवा तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालय येथे करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी केले आहे.

तालुकानिहाय शेल्फवर उपलब्ध असलेली कामे
तालुका
कामे
अपेक्षित निर्माण होणारे मनुष्यदिन
कारंजा
९९३
३९,४३६
मालेगाव
६५१
९३,९८८
मंगरूळपीर
३१७
१,०२,४१७
मानोरा
६६०
४२,९४७
रिसोड
१२९१
२,०७,९४५
वाशिम
२१७
७२,८४९
एकूण
४,१२९
५,५९,५८२

अपूर्ण कामांचा तालुकानिहाय तपशील
कामे
कारंजा
मालेगाव
मंगरूळपीर
मानोरा
रिसोड
वाशिम
एकूण
घरकुल
६९५
१००५
४३८
६६६
१०४२
४०५
४२५१
सिंचन विहिरी
४४४
२५४
९७
३७५
१९९
२४५
१६१४
फळबाग
१०९
१९४
३५२
२७२
११८
१३२
११७७
वृक्ष लागवड
१२२
२०१
१४६
१४०
१८५
८८
८८२
तुती लागवड
६२
९४
३६
३८
२४४
९१
५६५
शौचालय
३९
५१
७२
९९
२७०
रस्ते
१४
४४
२१
१३
१०३
१२
२०७
शोषखड्डे
२१
१३४
२१
१२
१९४
शेततळे
१२५
३७
१७८
रोपवाटिका
१७
५१
३४
१०
१२
१३३
स्मशानभूमी
६५
२६
२०
११३
गोठा
२९
 १६
४७
इतर
१०
८१
११५
एकूण
१५०८
२३१६
१२१४
१५८०
२०२२
११०६
९७४६

No comments

Powered by Blogger.