Header Ads

लक्षणे असल्यास ‘कोरोना’विषयक तपासणी करून घ्या


लक्षणे असल्यास ‘कोरोना’विषयक तपासणी करून घ्या

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांचे जनतेला आवाहन 


  •   वेळीच निदान झाल्यास ‘कोरोना’वर यशस्वी उपचार 
  •   सर्दी, ताप, खोकला असल्यास ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये या
  •   खाजगी डॉक्टर, ग्रामस्तरीय समित्या देणार माहिती



वाशिम, दि. ०२ (जिमाका) : कोरोना संसर्ग झाल्याचे वेळीच निदान होवून रुग्णावर योग्य उपचार झाल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील अशा रुग्णांचा शोध घेण्यासाठी ताप, सर्दी आणि खोकला आदी लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोरोना विषयक चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ही लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वतःहून पुढे येवून आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, सर्दी व खोकला यासारखी लक्षणे दिसून येतात. या आजारावर वेळीच उपचार झाल्यास रुग्ण बरा होत असल्याचे आपण पहिले आहे. त्यामुळे ताप, सर्दी व खोकला यासारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची कोरोना विषयक तपासणी करण्यात येणार आहे. जेणेकरून कोरोना संसर्ग झालेले रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करता येणे शक्य होईल. तसेच त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्गही टाळता येईल. अशा व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तपासणीसाठी इतर ठिकाणी न जाता आपल्या आपल्या नजीकच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.

खाजगी डॉक्टर, ग्रामस्तरीय समित्या देणार माहिती
कोरोना विषाणू संसार्गाच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी व खोकल्याचा समावेश आहे. अशी लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना विषयक तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे ही लक्षणे असलेली व्यक्ती खासगी डॉक्टरांकडे आल्यास त्यांना नजीकच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये तपासणीसाठी पाठवावे. तसेच संबंधित रुग्णाची माहिती आरोग्य यंत्रणेला कळवावी. ग्रामस्तरीय समिती व शहरातील वार्डस्तरीय समित्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास असल्यास त्यांना नजीकच्या फिव्हर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी पाठवावे. तसेच सदर व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला कळवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिल्या आहेत.

येथे आहेत ‘फिव्हर क्लिनिक’
१)     वाशिम तालुका- आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, सिव्हील लाईन, वाशिम
२)     रिसोड तालुका- अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा, सवड
३)     मालेगाव तालुका- नवीन तहसील कार्यालय, मुख्य इमारत, मालेगाव
४)   मंगरूळपीर तालुका- अल्पसंख्याक वसतिगृह, मंगरूळपीर
५)    कारंजा लाड तालुका- एम.बी. आश्रम, मुर्तीजापूर रोड, झाशी राणी चौक जवळ, चंदनवाडी, कारंजा लाड
६)     मानोरा तालुका- औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मानोरा

No comments

Powered by Blogger.