Header Ads

ज्वारीचे कोमटे असलेल्या शेतात जनावरे चरायला नेवू नका


ज्वारीचे कोमटे असलेल्या शेतात जनावरे चरायला नेवू नका

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांचे आवाहन 


वाशिम, दि. ०२ (जिमाका) : गेल्या काही दिवसांपासून कारंजा व मानोरा तालुक्यात ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने जनावरांना विषबाधा झाली व ती मरण पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीचे कोमटे असलेल्या शेतात जनावरे चरायला नेवू नयेत. शेतकऱ्यांनी ज्वारीची कोमटे असलेल्या शेताची नांगरणी करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांनी केले आहे.
मनभा, येवता बंदी, जनुना, पोहा या गावात ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने काही जनावरांना विषबाधा झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी तत्काळ उपचार केले आहेत. परंतु, जास्त प्रमाणात कोमटे खाल्ल्याने विषबाधा होवून जनावरे मृत्युमुखी पडतात. कोमटे खाऊन जनावरांना विषबाधा झाल्यावर तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेवून जावे. तसेच जनावरांच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. वानखडे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.