Header Ads

सलून, केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स उद्या पासून सुरु करण्यास मुभा


सलून, केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स उद्या पासून सुरु करण्यास मुभा

जिल्हा प्रशासनाने केले आदेश व मार्गदर्शक सूचना जारी  

वाशिम, दि. २६ (जिमाका) : जिल्ह्यात २७ जून २०२० पासून काही अटी आणि शर्तींसह केशकर्तनालये, ब्युटी पार्लर व सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश व मार्गदर्शक सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज, २६ जून रोजी निर्गमित केल्या आहेत.

सलून, केशकर्तनालय आणि ब्युटी पार्लरमध्ये मर्यादित सेवा सुरु ठेवता येतील. यामध्ये केशकर्तनहेअर डायवॅक्सींगथ्रेडींग याच सेवांचा समावेश आहे. त्वचेशी संबंधीत इतर कोणतीही सेवा देता नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल. दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, एप्रॉन आणि मास्क सारख्या सुरक्षीत साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.

ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची, सामायिक वापराची जागा (लादी/फ्लोर) दर दोन तासांनी सॅनिटाइज करावी लागेल. फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेलनॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. हता वस्तूंचा अथवा साधनांचा एका वापरानंतर सेवा देण्यासाठी पुन्हा वापर केला जातो, अशा वस्तू, साधनांचे प्रत्येक सेवा दिल्यानंतर सॅनिटाइज आणि निर्जंतुकीकरण करावे लागेल. या सर्व सूचना ग्राहकांच्या माहितीसाठी प्रत्येक दुकानात लावणे बंधनकारक राहणार आहे.

No comments

Powered by Blogger.