Header Ads

उद्यापासून शहरातील प्रत्येक परिवाराची आरोग्य बाबत तपासणी केली जाणार

कोरोनाच्या लढाईत संक्रमीत संख्या रोखणेसाठी प्रशासनाचे मोठे पाऊल 

उद्यापासून शहरातील प्रत्येक परिवाराची आरोग्य बाबत तपासणी केली जाणार 

आरोग्य टिमने योग्यरित्या कार्य पार पाडावे व शहरवासीयांनी सहकार्य करावे

उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांचे आवाहन 

कारंजा (जनता परिषद) दि.२० - शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, शहरी भागात घरोघरी जाऊन नागरिकांची कोव्हिड-१९ या आजाराबाबतच्या लक्षणे असणार्‍या रुग्णांचे आरोग्य सर्वेक्षण करणे गरजेचे झाले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी Incident Commandar म्हणून केेलेल्या नियुक्तीनुसार कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना सर्वेक्षण करण्याचे वेळापत्रकनुसार कार्य सोपविले आहे. उद्या दिनांक २१ जुन पासून ते २३ जुन पर्यंत ३ दिवस शहरातील मतदान केंद्र क्रमांक नुसार एकुण ३० पथक हे सर्व्हेक्षण करणार आहे. याबाबत सर्व्हे करण्याचे आदेशीत करण्यात आलेल्या सर्वच कर्मचार्‍यांना उद्या २१ जुन रोजी १० वाजता तहसिल कार्यालयात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

मतदान केंद्र क्रमांक नुसार ३० पथके 

मतदान केंद्र क्रमांक नुसार बिएलओ, बिएलओ सहाय्यक, आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका अशी चार जणांची टिम एकत्रितरित्या कार्य करणार आहे. शहरातील मतदान केंद्राची संख्या ही ६५ आहेत त्यातील सद्यस्थितीत ३० केंद्रांसाठी ही पथके तयार करण्यात आलेली आहेत. शहरातील कॉन्टेंन्मेंट झोन मध्ये ह्या तपासण्या सुरु असून उर्वरित केंद्रांसाठी ३ दिवसांनंतर तपासणी केली जाणार आहे. 


कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणार 

या पथकाचे माध्यमातून आरोग्य विभागाचे वतीने १) गर्भवती मातांचे व ६० वर्षावरील व्यक्तींचे HTN, DM, Combobid condition बाबत तपासणी करणेचे कार्य तसेच २) कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची Pulse Ox Meter द्वारे SPO2 व थर्मल स्कॅनर द्वारे तपासणी केली जाणार आहे. मधुमेह, हृदयरोग, उच्च-रक्तदाब, क्षयरोग आदी अतिजोखमीचे आजार असणार्‍यांंनी योग्य माहिती द्यावी. ६० वर्षावरील व्यक्ती व गरोदी महिला यांचीही माहिती द्यावी. ही माहिती आपले आरोग्यासाठीच असून याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे कुटुंबात असे आजार असलेल्यांची अचूक माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. बिएलओ व सहाय्यक हे सर्वेक्षणपुर्वी कुटुंबाची ओळख घेणार व टिमची ओळख देऊन तपासणीच्या सर्व नोंदी घेणार आहेत. अंगणवाडी सेविकाही त्यांना या कार्यात सहाय्य करतील. 

कर्तव्यात हलगर्जी केल्यास कायदेशीर कार्यवाही

आपसी ताळमेळ राखून हे कार्य पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून कामास नकार दिल्यास, हलगर्जी केल्यास व यामुळे कोरोना रोगाचा प्रसार वाढल्यास आपत्ती व व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील दंडनीय तरतुद कलम ५१ नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. 

सर्व्हे मध्ये काही अडचण गेल्यास पोलिसांची मदत घ्यावी 

याबाबत आज रोजी काढण्यात आलेल्या एका आदेशानुसार, आरोग्य विभाग, बिएलओ कर्मचारी व बिएलओ सहाय्यक तसेच अंगणवाडी सेविका यांचे कर्तव्य व जबाबदारी निश्‍चित करण्यात आली असून तसे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर्व्हे मध्ये काही अडचण गेल्यास पोलिसांची आवश्यकता भासल्यास तसे संपर्क करण्याचे ही त्यांना निर्देशीत करण्यात आले आहे. 

No comments

Powered by Blogger.