Header Ads

20 जून : संध्याकाळचे अहवालात वाशिम जिल्ह्यात ७ पॉझिटिव्ह

20 जून : संध्याकाळचे अहवालात वाशिम जिल्ह्यात ७ पॉझिटिव्ह 

आज एकाच दिवसात एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली ८

तालुका : वाशिम -०४, रिसोड - ०१ तर कारंजा ०२  


कारंजा (जनता परिषद) दि.२० - वाशिम जिल्ह्यात आज संध्याकाळी प्राप्त अहवालांनुसार, ७ व्यक्तींचे कोरोेना विषयक अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आज दिवसभरात दुपारचे १ व संध्याकाळचे ७ असे एकुण ८ रुग्ण हे कोरोना बाधीत निघाले आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 
संध्याकाळी प्राप्त अहवालांनुसार, रिसोड तालुक्यातील १, वाशिम तालुक्यातील ४ तर कारंजा तालुक्यातील २ व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजन पुर्वीचे कोरोनाबाधितांचे संपर्कातील आहेत. 
रिसोड तालुक्यातील ग्राम आसेगांव पेन येथील २९ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. वाशिम तालुक्यातील ग्राम तामसी येथील एकाच कुटुंबातील ३५ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा व २ वर्षीय बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पांचही व्यक्ती आसेगांव पेन येथील कोरोना बाधीत वृद्धेच्या संपर्कातील आहेत. 
कारंजा शहरातील भिमनगर भागातील ५६ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. हे दोन्ही अकोला येथे मृत्यू पावलेल्या कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील आहेत. 
यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ७९ वर पोहोचली असून यांतील ऍक्टीव्ह रुग्ण संख्या ही ५८ वर पोहोचली आहे. 

No comments

Powered by Blogger.