Header Ads

कोरोनाला जीवनाचा अविभाज्य घटक समजून त्याच्या पासून स्वत:चा बचाव करा - जिल्हा पोलिस अधिक्षक

washim SP Vasant Pardeshi, Janta Parishad

कोरोनाला जीवनाचा अविभाज्य घटक समजून त्याच्या पासून स्वत:चा बचाव करा 

जिल्हा पोलिस अधिक्षक परदेशी यांचे वाशिम जिल्हावासीयांना आवाहन 

वाशिम (जनता परिषद) दि.२० - नागरिकांनी कोरोनाला जीवनाचा अविभाज्य घटक समजून त्याच्या पासून आपला बचाव कसा होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी  जिल्हावासियांना केले आहे. 
एका चित्रफितद्वारे त्यांनी जागरुक राहणेसाठी व प्रशासनाचे नियमांचे पालन करणेचे जनतेला आवाहन केले. विनाकारण मार्केट मध्ये व रस्त्यावर गर्दी करु नका, मास्क लावल्याशिवाय बाहेेर पडू नका, वाहतूक नियमांचे पालन करा, लॉकडाऊन नियमांचे पालन करा, गर्दी टाळा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केेले .
कोरोना हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक समजून त्याच्याशी लडायला शिका, नियमीत शरीराची स्वच्छता ठेवा, घराबाहेर पडल्यावर स्नान केल्याशिवाय परिवारात सामील होऊ नका, स्वत:ची व स्वत:चे परिवाराची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. 

No comments

Powered by Blogger.