Header Ads

व्यापारी जनता कर्फ्यु दुसऱ्या दिवशीही शंभर टक्के यशस्वी; कालही होता उत्स्फूर्त प्रतिसाद


व्यापारी जनता कर्फ्यु दुसऱ्या दिवशीही  शंभर टक्के यशस्वी; कालही होता उत्स्फूर्त प्रतिसाद 

पुढचे दोन दिवसही अशीच स्थिती हवी 

शहरासह ग्रामीण भागातील जनतेचेही भरभरुन समर्थन 

पोलिस, महसुल, पालीका सह आरोग्य यंत्रणेनेही केले स्वागत

कारंजा बाजार समितीचाही निर्णयही ठरला सिंहाचा वाटा 

कारंजा (जनता परिषद) दि.१९ - कारंजातील व्यापार्‍यांनी पुकारलेल्या व्यापारी जनता कर्फ्युचा पहिला दिवस शंभर टक्के यशस्वी झाल्यानंतर आज दूसरे दिवशीही सर्वच दुकाने बंद आहेत. या  कर्फ्युला कारंजेकरांनी मोठा प्रतिसाद देऊन आत्तापर्यंत १०० टक्के यशस्वी केले आहे. आजही दुकाने बंदच असून नागरिकही  घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या बंदला कारंजा तालुक्यातील ग्रामीण जनतेचाही मोठा हातभार लाभला आहे. त्यांनीही शहरात येण्याचे टाळून व्यापार्‍यांच्या या जनता कर्फ्युला भरभरुन प्रतिसाद दिला. उर्वरित आज व दोन दिवस जनतेने याचे समर्थन करुन कोरोनाची साखळी शक्य तितकी तोडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. 
१७ जुन रोजीच कारंजा शहरातील समस्त व्यापार्‍यांनी एकत्र येत सर्व व्यापारी असोसिएशनचे वतीने १८ जुन ते २१ जुन असे ४ दिवस कारंजा शहरात स्वयंस्फुर्तीने व्यापारी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. यामध्ये काल पहिल्या दिवशी कारंजातील सर्वच लहान मोठ्या दुकानदारांनी, व्यापार्‍यांनी आपले पुर्ण सहकार्य देत आपापली दुकाने व प्रतिष्ठाणे बंद ठेवलीत; अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले होते. यामुळे कारंजा शहरात काल संपूर्ण दिवस शुकशुकाट बघावयास मिळाला. 

कारंजातील व्यापार्‍यांचा मोठा पुढाकार 

कारंजा शहरात कोरोना ह्या वैश्‍विक महामारीचा गर्दी व संपर्कातून होणारा प्रसार रोखणेसाठी स्वत: आर्थिक झळ सोसून दुकाने बंद ठेवण्याचा मोठा निर्णय कारंजातील व्यापार्‍यांनी केला. याला जनतेचेही समर्थन प्राप्त झाले. 

महसुल, पोलिस, पालीका, आरोग्य प्रशासनाने केले स्वागत 

कारंजात कोरोनाच्या वाढत्या संख्येचा सर्वात जास्त ताण हा महसुल, पोलिस, पालीका व आरोग्य यंत्रणांवर पडत आहे. उपविभागीय अधिकारी राहुल जाधव व तहसिलदार धिरज मांजरे यांच्या मार्गदर्शनात महसुल विभाग; उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील व ठाणेदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वात कारंजा शहर पोलिस विभाग, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांच्या नेतृत्वात पालिका प्रशासन व उपजिल्हा रुग्रालयाचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग हे पहिल्याच दिवसापासून जिवावर उदार होत आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. या सर्वच यंत्रणांनी व्यापार्‍यांचेे व त्याला लाभत असलेले जनतेचे व्यापारी जनता कर्फ्युचे स्वागत केले असून व्यापारी व जनता हे कर्तव्या प्रति ही तितकेच जागरुक असल्याचे मत या यंत्रणांनी व्यक्त केले आहे. 

कारंजा कृषि उत्पन्न बाजार समितीचा निर्णय ठरला सिंहाचा वाटा 

दरम्यान, दिनांक १७ जुन रोजीच कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी, व्यापारी, हमाल, कर्मचारी यांच्या जिवीत्वाचे रक्षणासाठी कोेरोनाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी व्यापारी व अडते यांच्या विनंतीनुसार १८ जुन ते २२ जुन पर्यंत बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. ह्या निर्णयामुळे भाजी विक्रेते, फळ-फळावळ विक्रेते, बाजार समितीत आपले धान्य विक्रीस आणणारे कास्तकार, व्यापारी, ने-आण करणारी वाहतूक यंत्रणा, कर्मचारी, हमाल, मापारी, अडते आदींची वर्दळही रोखली गेली. यामुळे कारंजातील व्यापार्‍यांनी पुकारलेल्या ह्या व्यापारी जनता कर्फ्युला कारंजा कृषि उत्पन्न बाजार समितीने घेतलेले निर्णयाचा मोठा उपयोग झाला आहे. 


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.