Header Ads

चाईल्ड लाईन ने वाशिम जिल्ह्यात सलग दोन दिवसात दोन बालविवाह रोखले

चाईल्ड लाईन ने वाशिम जिल्ह्यात सलग दोन दिवसात दोन बालविवाह रोखले

मानोरा नंतर रिसोड तालुक्यातही बालविवाहचा प्रकार


वाशिम (जनता परिषद) दि.१९ - वाशिम जिल्ह्यात चाईल्ड लाईनच्या वतीने जिल्ह्यातील सलग दोन दिवसात दोन बालविवाह रोखण्यात यश मिळविले आहे. १७ जुन रोजी मानोरा तालुक्यात १४ वर्षीय बालीका व १८ जुन रोजी रिसोड तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलींचे  होऊ घातलेले बालविवाह रोखण्यात आले आहे. 

मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे १४ वर्षीय बालीकेचा १७ जुन रोजी होणार बालविवाह रोखला 

१७ जुन रोजी ग्राम फुलउमरी (सोमेश्‍वर नगर) येथे एका १४ वर्षीय बालीकेचा होऊ घातलेल्या विवाहाची माहिती यवतमाळ व बुलडाणा जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून वाशिम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांना मिळाली. त्यानुसार राठोड यांनी चाईल्ड लाईनचे वतीने मानोरा तालुका कनिष्ठ संरक्षण अधिकारी रामदास वानखडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी भगवान ढोले, संरक्षण अधिकारी कु. लक्ष्मी काळे, सामाजिक कार्यकर्ता रमेश वाघ, माहिती विश्लेषक रवी वानखडे यांच्याशी संपर्क साधून तत्काळ बालविवाह रोखण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
फुलउमरी येथील प्रतिष्ठित नागरिक रमेश पवार, सोमेश्वर नगर येथील सरपंच रेखा शेलकर, पोलीस पाटील मधुकर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रुपचंद जाधव, अंगणवाडी सेविका निर्मला चव्हाण व संगीता राठोड यांच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेण्यात आले.

रिसोड तालुक्यातील मोठेगांव येथे १६ वर्षीय बालीकेचा १८ जुन रोजी होणार बालविवाह रोखला 

रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह १८ जून रोजी आयोजत करण्यात आल्याची माहिती ‘चाईल्ड लाईन’च्या माध्यमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांना प्राप्त झाली. त्यानंतर तातडीने मुलीच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे समुपदेशन करून बालविवाह रोखण्यात आला.
मोठेगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह १८ जून रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘चाईल्ड लाईन’कडून प्राप्त झाल्यानंतर राठोड यांनी रिसोड तालुक्यातील कनिष्ठ संरक्षण अधिकारी गोपाल घुगे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी कु. लक्ष्मी काळे, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी एम चौधरी, सामाजिक कार्यकर्ता अनंता इंगळे, क्षेत्रीय कार्यकर्ता रामेश्वर वाळले यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
मोठेगाव येथील सहाय्यक पोलीस महेंद्र गवई व पोलीस पथक, चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश राऊत, संदेश देशपांडे, सरपंच अनंतराव देशमुख, ग्रामसेवक एम. बी. देशमुख, ग्राम पंचायत सदस्य प्रल्हाद काष्टे, यशवंत मोरे, आरोग्य सेविका आर. पी. नवाळे, आशा कर्मचारी सुनिता मोरे, छाया कवदे, मदतनीस विमलाबाई देशमुख यांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेचे वडील व कुटुंबीय यांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेण्यात आले. 
बालविवाहांना उपस्थित राहणे हे ही कायद्याने गुन्हा असून जिल्ह्यात कोणत्याही गावात बालविवाह होत असल्यास नागरिकांनी ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन राठोड यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.