Header Ads

दि.१९ : वाशिम जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा ७१

दि.१९ :  वाशिम जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा ७१  

जिल्ह्यातील कारंजात पुन्हा ३ कोरोना पॉझिटिव्ह 

हॉटस्पॉट बनलेले कारंजात संपर्कातून कोरोनाचा उद्रेक 

वाशिम (जनता परिषद) दि. १९ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेले माहितीनुसार, कारंजात पुन्हा ३ जणांच्या कोरोना विषयक चाचणींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याने कारंजा हॉटस्पॉट बनल्याचे चित्र समोर येत आहे. संपर्कातून ह्या रोगाचा प्रसार झाला आहे. 
पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये माळीपुर्‍यातील एका १० वर्षीय व एका ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे. ही दोन्ही मुले कोरोना बाधीत आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. तर १ व्यक्ती ही २३ वर्षीय युवक असून तो अकोला येथे मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कातील आहे. 
यामुळे वाशिम जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधीतांचा आकडा हा ७१ झाला असून यांतील ५६ हे ऍक्टीव्ह तर १३ जणांना डिस्जार्च देण्यात आलेला आहे. २ जण हे मृत्यू पावले आहेत. एकुण पॉझिटिव्ह रुग्णसंख्येमध्ये जिल्ह्याबाहेर पॉझिटिव्ह आलेल्या व उपचारासाठी जिल्ह्यात दाखल २ रुग्णांचाही समावेश आहे. 

No comments

Powered by Blogger.