Header Ads

‘किसान क्रेडीट कार्ड’च्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज


‘किसान क्रेडीट कार्ड’च्या माध्यमातूनशेतकरी पशुपालकांना मिळणार बिनव्याजी कर्ज

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे 


वाशिम, दि. ०२ (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसोबतच जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाचा फायदेशीर पर्याय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व प्रगतशील होण्यासाठी पशुपालकांना केंद्र शासनाच्या किसान क्रेडीट कार्डद्वारा पिक कर्जाप्रमाणेच दुधाळ पशुधन खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन विभागातर्फे जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डवर पिक कर्जाशिवाय हे १ लाख ६० हजार रुपये कर्ज बिनव्याजी मिळणार आहे. दुधाळ पशुधन खरेदीसह, शेळी, मेंढी, कुक्कुट आणि मत्स्यपालनाकरिता शेतकरी, पशुपालकांना हे कर्ज उपलब्ध होणार आहे. या कर्जासाठी शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा व इतर माहितीसह अर्ज संबंधित पंचायत समितीचे तालुका पशुधन अधिकारी (विस्तार) यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन डॉ. वानखडे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.