Header Ads

कारंजा शहरातील गांधी चौक व परिसरातील भाग कॉन्टेंन्मेंट झोन घोषित

कारंजा शहरातील गांधी चौक व परिसरातील भाग कॉन्टेंन्मेंट झोन घोषित  

पुढील आदेशापर्यंत कलम १४४ अन्वये मनाई हुकुम लागू 

कारंजा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांचे आदेश 

कारंजा (जनता परिषद) दि.१२ - आज रोजी कारंजा शहरातील गांधी चौक या भागातील एका इसमाचा अमरावती येथे कोरोना बाबतीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तरी सदरील विषाणूचा संसर्ग वाढू नये व त्यावर तातडीने नियंत्रण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात राहावी, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी ह्याकरीता या भागात पुढील आदेशापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ नुसार मनाई हुकुम लागू करण्यात येत आहे, असे आदेश कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी जारी केले आहे. 
कारंजा शहरातील गांधी चौक, (१. इन्नाणी कॉम्प्यूटर ते इकरा बुक डेेपो, २. वृदंावन ज्वेलर्स ते गांधी चौक, ३.अविनाश मेडीकल ते गांधी चौक, ४.मेहबुब टेलर ते त्रिवेदी यांचे दुकान, ५. अलीम चिकन सेंटर ते भदावडी विहीर, मस्जिदपुरा व ६. गांधी चौक ते चुनापुराकडे जाणारा रस्ता) या भागात (भागाकडे येणारे सर्व प्रकारचे रस्ते, हद्दी व त्या हद्दीतील भौगोलिक क्षेत्रात समाविष्ठ निवास व व्यापार क्षेत्र सह) दि.१२ जुन २०२० रोजी सदरहू आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत सर्व इसमांना फिरण्यास मज्जाव करणेकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १४४ नुसार मनाई हुकुम आदेश लागू करण्यात आले आहे. 
या आदेशाची अंमलबजावणी ही कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार व कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी यांचेवर सोपविण्यात आली आहे. वर उल्लेखीत या भागात चारही सिमा बंद करण्यात येऊन या भागामध्ये येण्यास व जाण्यास फौजदारी प्रक्रिया संहीता, १९७३ चे तरतुदीनुसार मज्जाव घालण्यात येऊन मनाई हुकुम लागू करण्यात आला असल्याचे आदेश कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी दिले आहे. 

No comments

Powered by Blogger.