Header Ads

कॉन्टेंन्मेंट झोन मध्ये कायदेभंग करणार्‍या ८ जणांवर गुन्हे दाखल

कॉन्टेंन्मेंट झोन मध्ये कायदेभंग करणार्‍या ८ जणांवर गुन्हे दाखल

कारंजा  नगर परिषदचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची तक्रार 

कारंजा शहर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल 

कारंजा (जनता परिषद) दि. १२ - कोरोना कॉन्टेंन्मेंट झोन मध्ये कायदेभंग केल्याप्रकरणी ८ जणांवर कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्या तक्रारीनुसार कारंजा शहर पोलिस स्टेशनने आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्यांची नोंद केली आहे. 
कारंजा शहरात काल दि.११ रोजी शिवाय नम: मठाजवळ राहणार्‍या एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. यामुळे कारजंाचे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये या भागाला कॉन्टेंन्मेंट झोन म्हणून घोषीत करुन तात्काळ रुपात या भागात नागरिकांच्या येण्या/जाण्या आणि फिरण्यावर बंदी घालण्यात आली होती. 
मुख्याधिकारी यांनी दिलेले तक्रारी नुसार, आपण आज रोजी सकाळी ९.०० वाजता या भागाला भेट दिली असता, सदरहू आठही व्यक्ती ह्या शहरातून फिरून परत आले असल्याचे आढळून आले त्यामुळे प्रतिबंधीत केलेल्या परिसराच्या बाहेर कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. या आठही व्यक्तींनी बेजबाबदारपणे वर्तन केल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कायद्यांचा भंग केला आहे. अशी तक्रार दिली आहे. 
नरेंद्र गोविंदराव राठोड (वय ४२ वर्ष) रा.दापुरा ता.मानोरा, नयन वाघमारे (वय २० वर्ष) रा.मंगरुळवेस कारंजा, मनोज अशोकराव काळे (वय ४२ वर्ष) रा.शिवाय नम: मठ, भिका गोपीराम राठोड (वय ३४ वर्ष) रा.वडगांव, संजय सकरु जाधव (वय ३० वर्ष) रा.वडगांव, विनोद नामदेव पाटील (वय ४२ वर्ष) रा.शिवाय नम: मठ, गजानन पंजाबराव काजे (वय ४२ वर्ष) रा.शिवाय नम: मठ, संजय ओंकार दारव्हेकर (वय ३० वर्ष) रा.शिवाय नम: मठ  या आठही जणांचे विरोधात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २,३,४, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ब भांदवीचे १८८, २६९, २७०, २७१ नुसार कायदेशीर कारवाई करणेसाठी कारंजा शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहे. 
याबाबतचा अधिक तपास गजानन वर (एचसी) कारंजा शहर पोलिस स्टेशन हे करीत आहे. 

No comments

Powered by Blogger.