Header Ads

१३ जुन : वाशिम जिल्ह्यात संध्याकाळी ७ पॉझिटिव्ह

१३ जुन : वाशिम जिल्ह्यात संध्याकाळी ७ पॉझिटिव्ह

तालुकानिहाय वाशिम -०१; मंगरुळपीर -१;  रिसोड -३, कारंजा -२ 

कारंजातील त्या रुग्णाची पत्नी व मुलगीही कोरोनाने बाधीत 

ऍक्टीव्ह रुग्ण - ४० तर आतापावेतो एकुण रुग्ण - ४८ 

कारंजा (जनता परिषद) दि.१३ - वाशिम जिल्ह्यात आज संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार, ७ व्यक्तींचे कोरोना विषयक चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. कालच्या १६ पॉझिटिव्ह नंतर आज पुन्हा ७ इतक्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यात नागरिकांंमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन शक्य ते सर्व प्रयत्न करीत असून नागरिकांनी स्वत: सर्वच सुचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. 
आज प्राप्त माहितीनुसार, संध्याकाळी प्राप्त या अहवालातील ७ जणांमध्ये ०१ बोराळा ता.वाशिम, १ शेलुबाजार, ता.मंगरुळपीर,  ३ रिसोड तालुका व २ कारंजा तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 
जिल्ह्यातील ऍक्टींव रुग्णांची संख्या ही ३९ झाली असून आतापावेतो एकुण ४८ रुग्ण झाले आहेत. दरम्यान, मानोरा तालुक्यातील ग्राम भोयणी येथील ६० वर्षीय महिला ही बरी झाल्याने त्यांना आज डिस्जार्च देण्यात आला आहे. 
वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील ३२ वर्षीय महिला बाधीत आढळून आली आहेे. 
औरंगाबाद येथून रिसोड येथे आलेल्या २०, २४ व २७ वर्षीय युवकांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील ६५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. सदरहू रुग्णाला एका खाजगी रुग्णालयाने रेफर केले होते. 

कारंजातील २ पॉझिटिव्ह शिवाय नम: मठा परिसरातील

त्या रुग्णाची पत्नी व मुलगी बाधीत 

कारंजात आज रोजी प्राप्त माहितीनुसार, शिवाय नम: मठ परिसरातील २ जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. ११ जुन रोजी येथील एका इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या भागाला सिल करुन संबंधीत व्यक्तीचे संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होेते व त्यांचे कोरोना विषयक चाचणीही घेण्यात आली होती. यांतील २ जणाचे अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याने संपुर्ण कारंजा शहरात एकच खळबळ उडाली आहे. यांत त्या रुग्णाची पत्नी (वय ४५ वर्ष) व मुलगी (वय १५ वर्ष) यांचा समावेश आहे. 
     प्रशासन संपूर्ण जीव ओतून आपले कार्य करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. 

No comments

Powered by Blogger.