Header Ads

कारंजात रक्तदान शिबीरात ८९ लोकांनी केले रक्तदान; धाकतोड कुटुंबातील....;तहसिलदार...;संदेश जिंतूरकर....

कारंजात रक्तदान शिबीरात ८९ लोकांनी केले रक्तदान 

धाकतोड कुटुंबातील ५ जणांनी केले रक्तदान; किशोर धाकतोड यांचे ६० वे रक्तदान

तहसिलदार धिरज मांजरे यांनी रक्तदान करुन दिली प्रेरणा 

संदेश जिंतूरकर यांचे २१ वे रक्तदान तर पत्नीनेही केले रक्तदान 

कारंजा (जनता परिषद) दि.०९ - रविवार दि.०७ जुन रोजी कारंजातील विविध सामाजीक संघटनांनी एकत्र येत रक्ताचा पुरवठा कमी होत असल्याचे शासनाचे आवाहनाला ओ देत रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. स्थानीक महेश भवन येथे हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबीरात तब्बल ८९ जणांनी रक्तदान करीत सामाजीक बांधीलकी जोपसली. 
धाकतोड कुटुंबातील ५ जणांनी केले रक्तदान; किशोर धाकतोड यांचे ६० वे रक्तदान
रक्तदान करणार्‍यांमध्ये धाकतोड परिवाराचे ५ सदस्यांनी रक्तदान केले. इतकेच नव्हे तर धाकतोड कुटुंबातील जेष्ठ तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ धाकतोड यांचे हे रक्तदान ६० वे रक्तदान ठरलेे. याच कुटुंबातील अतुल धाकतोड यांनी २४, निशांत धाकतोड ७, सुशांत धाकतोड १२ तर श्रेणीक धाकतोड यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील ५ जणांनी सामाजीक संघटनांच्या रक्तदानाचे आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. 
तहसिलदार धिरज मांजरे यांनी रक्तदान करुन दिली प्रेरणा
संपुर्ण लॉकडाऊन काळात कारंजा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये, यासाठी कंबर कसलेले  तालुक्याचे दंडाधिकारी म्हणजेच तहसीलदार धिरज मांजरे यांनीही रक्तदान शिबीरात रक्तदान केले. कोरोनाच्या संकटमय काळात लॉकडाऊन दरम्यान शासन, प्रशासन व तालुक्याची जनता यांच्यातील मुख्य म्हणून भूमीका बजावणारे तहसीलदार धिरज मांजरे यांचे रक्तदान हे एक उदाहरणच होय. 
संदेश जिंतूरकर यांचे २१ वे रक्तदान; पत्नीनेही केले पहिल्यांदा रक्तदान 
येथील सामाजीक कार्यकर्ते संदेश जिंतूरकर यांनी आजचे रक्तदान शिबीरात रक्तदान करीत २१ व्या वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला. विशेष म्हणजे या शिबीरात पती-पत्नी उभयतांनी रक्तदान केले. सौ.गुंजन संदेश जिंतूरकर यांनी पहिल्यांदाच रक्तदान केले. 
अनेक संघटनांनी केले होते आयोजन व नियोजन
कोरोना या संकटाचे काळात रक्ताची कमी पडत असून यासाठी रक्तदान करण्यास पुढे यावे, या शासनाचे आवाहनाला ओ देत कारंजातील अनेक सामाजिक संघटना ह्यांनी रक्तदान शिबीराचे एकत्रीतरित्या आयोजन केले होते. आर्ट ऑफ लिव्हींग परिवार, कारंजा डॉक्टर्स असोसिएशन, कारंजा केमिस्ट ऍण्ड ड्रगीस्ट असोसिएशन, विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर, माजी सैनीक संघटना, जिव्हाळा परिवार, महेश सेवा समिती, भारतीय जैन संघटना इत्यादी संघटनांनी ह्या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. स्थानीक महेश भवन येथे सकाळी ९ पासून ह्या रक्तदान शिबीराला सुुरुवात झाली. यामध्ये तब्बल ८९ जणांनी रक्तदान केले.

No comments

Powered by Blogger.