Header Ads

वाशिम जिल्हा : पुन्हा १ कोरोना बाधीत

वाशिम जिल्हा : पुन्हा १ कोरोना बाधीत  

ऍक्टीव्ह रुग्ण संख्या  पोहोचली ६ वर तर आजवरची  एकुण संख्या झाली  १४ 

वाशिम (जनता परिषद) दि.०९ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळचे सत्रात १ कोरोेना बाधीत रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्ण संख्या ही १४ वर पोहोचली असून यांतील ६ रुग्ण हे ऍक्टीव आहेत.
आज संध्याकाळी प्राप्त अहवालांनुसार, मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम रामगांव येथील एका ६० वर्षीय महिलेचा रिपोर्ट हा पोझिटिव्ह आला आहे. रेड झोन असलेल्या पालघर जिल्ह्यातून रामगांव येथे आलेल्या १० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने हे तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होेते. यापैकी या एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून इतर ९ रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.
काल रात्रीच मुंबई येथून मानोरा तालुक्यातील ग्राम पोहरादेवी येथे आलेले कुटुंबातील ८ वर्षीय बालक व वाशिम तालुक्यातील ग्राम बोराळा येथील १५ वर्षीय बालीका ह्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

No comments

Powered by Blogger.