Header Ads

वाशिम जिल्ह्यात २ कोरोना रुग्ण आढळले : उशीरा रात्री आले अहवाल

वाशिम जिल्ह्यात २ कोरोना रुग्ण आढळले : उशीरा रात्री आले अहवाल 

जिल्ह्यात ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या झाली ५, आजवरची एकुण संख्या १३

वाशिम (जनता परिषद) दि.०९ - जिल्हा प्रशासनाने रात्री ११.०० वाजता दिलेल्या माहिती नुसार, काल दि.८ जुन रोजी रात्री उशीरा प्राप्त कोरोना संबंधीत चाचण्यांचे अहवालातून वाशिम जिल्ह्यातील २ व्यक्तींचे अहवाल हे पोझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या ही १३ झाली असून यांतील ५ व्यक्ती हे आता ऍक्टीव रुग्ण आहेत. ६ व्यक्ती बर्‍या झाल्या असून २ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. 
(१) मानोरा तालुक्यातील ग्राम पोहरादेवी येथील ८ वर्षीय बालकाला लागण 
मुंबई येथून आलेले व नांदेड येथील कोरोना बाधीत रुग्णाचे संपर्कात आले होते 
प्राप्त माहिती नुसार, मानोरा तालुक्यातील ग्राम पोहरादेवी येथील एका ८ वर्षीय बालकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून ह्या मुलाचे वडीलाचा अहवाल कालच निगेटिव्ह आला होता तर त्याच्या आईचा अहवाल हा अद्याप येणे बाकी आहे. सदरहू कुटुंब हे मुंबई येथून आले होते. पोहरादेवी येथे आल्यावर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.  पोहरादेवी येथे येण्याचे पुर्वी सदर कुटुंब नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आले होते. याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने हे तपसाणीसाठी पाठविण्यात आले होते. 
(२) दुसरा रुग्ण वाशिम तालुक्यातील बोराळा येथील कोरोना बाधीतचे संपर्कातील
दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा वाशिम तालुक्यातील ग्राम बोराळा हिस्से येथील आहे. सदरहू इसम हा कोरोना बाधीताचे नजीकच्या संपर्कातील आहे. ६ जुन रोजी प्राप्त अहवालांमध्ये येथील एक २५ वर्षीय युवक हा कोरोना बाधीत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार त्या युवकाचे संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे व पुढील तपासणी करण्याचे कार्य हे आरोग्य विभागाने हाती घेतले होते. 
 यामुळे आज रोजी येणार्‍या अहवालांकडे संपर्ण वाशिम जिल्हावासीयांचे लक्ष्य लागले आहे. 

No comments

Powered by Blogger.