आणि.... शेतकरी बंधूंनी शेतीची कामे पार पाडून केले रक्तदान : पोहा येथे दुर्गा माता संस्थानचे वतीने आयोजन
आणि.... शेतकरी बंधूंनी शेतीची कामे पार पाडून केले रक्तदान
पोहा येथे दुर्गा माता संस्थानचे वतीने आयोजन
रक्तदान शिबीरात ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
कारंजा (ता.प्र.) दि.११ - शेतकरी बांधवांनी शेतीची कामे पार पाडून नंतर रक्तदान शिबीरात जाऊन रक्तदान करीत एक अत्यंत उत्कृष्ठ असे उदाहरण सादर केले आहे. कारंजा तालुक्यातील ग्राम पोहा येथे दि ९ जून रोजी दुर्गा माता संस्थान येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात एकूण ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले . यावेळी सौ.कांता देवी डाळे ब्लड बँक वाशिम यांनी रक्त संकलन केले.
कोरोनाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपत एवढ्या भरभरून संख्येने ग्रामीण भागाच्या ठिकाणी रक्तदान केले. हे दात्यांची जागरूक कर्तव्यबुद्धी दर्शविते. सर्व शेतकरी बंधूनी आपली शेतीची कामे पार पाडून रक्तदान शिबिरास प्रतिसाद नोंदविला.

Post a Comment