Header Ads

कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांचे जनतेला आवाहन

नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये

गर्दी टाळा, मास्क वापरा, अंतर ठेवा

कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांचे जनतेला आवाहन 

दुकान व प्रतिष्ठाणांनी सोशियल डिसटेंसींग पाळणे गरजेचे 

कारंजा (जनता परिषद) दि.११ -  कारंजा तालुका व शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये, गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशियल डिसटेंसींगचे पुर्ण पालन करा. बाहेर पडतांना दोन व्यक्तींमधील अंतर हे ६ फुटाचे वर असु द्या असे आवाहन कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी जनतेला केले आहे.  
याबाबत त्यांनी एक ध्वनीफितही प्रक्षेपीत केली असून याद्वारे जनतेला संदेश दिलेला आहे. तालुक्यातील ग्राम दादगांव, शेमलाई, सुकळी या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. कारंजा शहरातही रेस्ट हाऊस जवळील ओम नम:शिवाय मठाजवळ रुग्ण आढळून आला असून नागरिकांनी आता खुप सतर्क राहणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले आहे. विनाकारण घरा बाहेर पडू नका. भाजीपाला, फळे, कापड दुकान आदींमध्ये गेल्यावर वस्तुंना हात लावले वर सॅनिटाईझरचा वापर करा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 
दुकाने व प्रतिष्ठाणांनी कार्य करतांना सोशियल डिसटेंसींग चे पुर्ण पालन करणे गरजेचे आहे. गिर्‍हाईकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवा. मास्कचा वापर करा. दुकानात येणारे तसेच दुकानातून जाणारे गिर्‍हाईक यांना योग्य प्रकारे सॅनिटाईजर चा वापर करण्यास लावणे दुकानदारांना गरजेचे आहे. तसेच आपले दुकानात काम करणारे कर्मचार्‍यांनीही दुकानात नियमांचे पालन करावेत याची जबाबदारी संबंधीत दुकानदारावरच आहे. शासनाचे नियमांचे पालन करा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

No comments

Powered by Blogger.