Header Ads

युवा पञकार आणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांचा 'कोरोना योध्दा' म्हणून सन्मान

युवा पञकार आणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांचा 'कोरोना योध्दा' म्हणून सन्मान

कोरोना पार्श्वभुमीवरील सामाजीक कार्याची दखलपञकारीतेच्या माध्यमातुनही सुरु आहे जनजागृती


     मंगरुळपीर (का.प्र.) ११  - कोविड 19 मध्ये देशासाठी,समाजासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जिल्ह्याच्या नागरीकांच्या सुरक्षेततेसाठी अहोराञ केलेल्या कार्याबद्दल युवा पञकार आणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांचा 'कोविड योध्दा' म्हणून महाराष्ट पुरोगामी पञकार संघाच्या वतीने सन्मापञ देवुन गौरविन्यात आले आहे.
       सदैव सामाजीक कार्यातुन आणी पञकारीतेच्या माध्यमातुन समाजहितासाठी झटणार्‍या युवा पञकार फुलचंद भगत यांच्या कोरोणाच्या पार्श्वभुमीवर जनजागृती आणी पञकारीतेच्या माध्यमातुन शासकीय आदेश,सुचना तसेच लोकहीतासाठी मदतकार्य यामध्ये सक्रीय सहभाग घेवून फिजिकल डिसटंन्गसिंग आणी शासकिय नियमांविषयी लोकांमध्ये जागृती करुन नेहमी शासकिय यंञणेला सहकार्य करन्याच्या भुमिकेची दखल घेवुन महाराष्ट पुरोगामी पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.विजय सुर्यवंशी यांनी सन्मानपञाव्दारे गौरव केला आहे.एका मोठ्या समारंभातही सन्मानचिन्ह देवून गौरविन्यात येणार असल्याचेही सांगन्यात आले आहे.पञकार फुलचंद भगत यांनी याआधीही प्रबोधन विचारमंच या व्हाट्सअप गृपच्या माध्यमातुन अनेक सामाजिक ऊपक्रम राबवले आहेत. 
     लग्नापुर्वी भगत नवदाम्पत्यांनी पाणी फाऊंडेशनसाठी श्रमदान,वृक्षारोपण केल्याने जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांचेकडुन जलदुत म्हणून पुरस्कार देवुन सन्मानित केले आहे,त्यांच्या पत्नीच्याही कार्याची दखल घेवुन नारिशक्ती सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला आहे.फुलचंद भगत हे तळागाळातले गावखेड्यातले सर्वसामान्य माणसांसाठी त्यांच्या हक्क आणी अधिकारांसाठी नेहमी झटुन न्याय मिळवून देत आहेत.शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी यांचेसह सर्व घटकांसाठी त्यांचे कार्य असुन विविध मागन्यावर शासनानेही दखल घेवुन न्याय दिला आहे त्यामुळे त्यांचे विविध स्तरातुन वेळोवेळी अभिनंदनही होत आहे.सध्या सर्वञ कोरोणाने कहर केल्याने सर्वसामान्य जनतेसह प्रशासनही चिंतातुर झाले आहे परंतु अशा परिस्थीतीतही भगत यांनी या बिकट परिस्थीतीतही आपल्या जीवाची पर्वा न करता हातावरचे पोट असणार्‍या,दिव्यांग,वृध्दासाठी मदत पोहचविन्याचे कार्य केले आहे. 
      शासकिय यंञणेला सहकार्य करुन लोकांमध्ये जनजागृती करन्याचे कार्य तसेच शासकिय सुचना,नियम,आदेश याविषयी पञकारीतेच्या माध्यमातुनही प्रसिध्दी देवुन लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणी कोरोनाला हरविन्यासाठी सर्वतोपरी जनता आणी प्रशासन यामध्ये समन्वय निर्माण होईल यासाठीही सदैव प्रयत्नशिल असणार्‍या कार्याची दखल घेवुन महाराष्ट पुरोगामी पञकार संघाने सन्मानपञ देवुन गौरव केला आहे.सदैव समाजहित आणी लोकहितासाठी कार्य करीत राहीन असा सकल्पही यावेळी युवा पञकार फुलचंद भगत यांनी बोलुन दाखवलेला आहे.या मिळालेल्या सन्माबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

No comments

Powered by Blogger.