Header Ads

आखतवाडा ग्राम पंचायतचे उपसरपंच पदी सौ.सिमा नितीन मोडक यांची अविरोध निवड

आखतवाडा ग्राम पंचायतचे उपसरपंच पदी सौ.सिमा नितीन मोडक यांची अविरोध निवड 

कारंजा (जनता परिषद) दि.२० - तालुक्यातील ग्राम आखतवाडा ग्राम पंचायतचे उपसरपंच पदी सौ.सिमा नितीन मोडक यांची अविरोध निवड करण्यात आली. काल दिनांक १९ रोजी पार पडलेल्या या निवडणूक सभेला ग्राम पंचायतचे ९ सदस्य उपस्थित होते. यावेळी सोशियल डिस्टेंसींगचे पुर्णपणे पालन करण्यात आले.
सरपंच सौ.योगिता चंद्रकांत गावंडे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सभेत ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार ढोबळे तर सहाय्यक म्हणून क्षिरसागर व ग्राम पंचायत सचिव  उपाध्ये  यांनी सहकार्य केले. 
सभेमध्ये एकमेव नाव असलेल्या सौ.सिमा नितीन मोडक यांची अविरोध निवड करण्यात आली. सर्व ग्राम पंचायत सदस्य सौ.मिना दि.राऊत, सौ.रंजना कि.सुरजुसे, सौ.हर्षाली ग.कान्हेरे, कु.पुष्पा अ.धनद्रव्ये, चंद्रकांत भि.गावंडे, संघपाल ना.गुळदे, उमेश भोजने, देवेंद्र फुके हे उपस्थित होते. 
निवडणूक अविरोध होण्यासाठी अनंता सुरजूसे, अविनाश धनद्रव्ये, दिपक राऊत आदींनी सहकार्य केले. निवडणूक कार्य चोखपणे पार पडणेसाठी पोलिस पाटील किशोर जाधव, कारंजा पोलिस स्टेशनचे कर्मचारी वानखडे व दिपक कराळे यांनी मदत केली. 

No comments

Powered by Blogger.