Header Ads

वाशिम जिल्ह्यात आज १ पॉझिटिव्ह; एकुण रुग्ण संख्या ७२

वाशिम जिल्ह्यात आज १ पॉझिटिव्ह; एकुण रुग्ण संख्या ७२

थोडा दिलासा : आज २३ पैकी २२ रिपोर्ट निगेटिव्ह तर ६ जणांना डिस्जार्च 

शेमलाई येथील बर्‍या झालेल्या महिलेला टाळ्या वाजवून वैद्यकीय चमुने केले रवाना 

आतापावेतो १९ कोरोनाबाधीत व्यक्ती झाले बरे; आता जिल्ह्यात ऍक्टीव्ह रुग्ण ५१

वाशिम (जनता परिषद) दि.२० - आज प्राप्त २३ अहवालात २२ रुग्ण हे निगेटिव्ह आले असून १ व्यक्ती हे पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती ही रिसोड येथील आसन गल्ली येथील ४५ वर्षीय पुरुष आहे. त्यांचे संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलन करण्याचे काम हे प्रशासन करीत आहे. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ७२ इतकी झाली आहे. 

दुसरीकडे आज २२ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून आजच जिल्ह्यातील ६ कोरोना बाधीत व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्जार्च देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधीत झाल्यावर बरे होणार्‍यांची संख्या ही १९ झाली आहे. यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही पॉझिटिव्ह रिपोर्ट येतच असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. 

शेमलाई येथील बर्‍या झालेल्या महिलेला टाळ्या वाजवून वैद्यकीय चमुने केले रवाना 

आज कारंजा कोव्हीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेली तालुक्यातील ग्राम शेमलाई येथील महिला ही बरी झाली.  येथील वैद्यकीय चमु व येथे कार्यरत असणार्‍या इतर सर्वांनी व उपचार सुरु असलेले व क्वारंटाईन झालेले सर्वांनी तिचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले व तिला डिस्जार्च दिला. यामुळे कोरोनाच्या भितीदायक वातावरणात चांगली बातमी आल्याचे नागरिकांना वाटत आहे. 

डिस्जार्च मिळालेल्या इतर ५ जणांमध्ये जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील ग्राम निमजगा येथील २ महिला व १ पुरुष, ग्राम बोराळा हिस्से येथील १ पुरुष, मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम शेलुबाजार येथील १ महिला यांचा समावेश आहे. 
दरम्यान जिल्हा प्रशासनाने दुपारी दिलेले माहितीनुसार, ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही ५१ आहे. 

No comments

Powered by Blogger.