Header Ads

कारंजा पांजरापोळ संस्थानचे अध्यक्षपदी युवा समाजसेवक ब्रिजमोहन मालपाणी



कारंजा पांजरापोळ संस्थानचे अध्यक्षपदी युवा समाजसेवक ब्रिजमोहन मालपाणी 

संस्थानचे आमसभेत झाली अविरोध निवड 

स्व.अशोक सावजी चवरे यांचे उत्कृष्ठ कार्याला स्मरण करुन दिली श्रद्धांजली  

     कारंजा (का.प्र.) दि.११ - स्थानीक पांजरापोळ गोरक्षण संस्थानचे अध्यक्षपदी येथील युवा समाजसेवक ब्रिजमोहन मालपाणी यांची अविरोध निवड करण्यात आली. दि.०४ जुन रोजी आयोजीत संस्थेच्या आमसभेत ही निवड करण्यात आली.
पांजरापोळ संस्थानचे अध्यक्ष श्री अशोक सावजी चवरे यांचे दु:खद निधन झाल्याने नूतन अध्यक्ष निवडीसाठी आमसभेचे आयोजन संस्था कार्यालय येथे करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्षस्थानी राजाराम भूतडा हे होते. आमसभेचे आयोजन बाबत माहिती देतांना संस्थेचे विश्‍वस्त आशिष तांबोडकर यांनी दिवंगत अशोक सावजी चवरे यांनी केेलेल्या कार्याची माहिती दिली. गत ६ वर्षात त्यांनी संस्थेचे उत्थानसाठी केलेल्या कार्याची प्रशंसा करीत त्यांचे कार्यकाळात संस्थेने केलेल्या प्रगती बाबत माहिती दिली. सर्व विश्‍वस्तांनी दोन मिनीटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर नुतन अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यांत विश्‍वस्त अमल चवरे यांनी ब्रिजमोहन मालपाणी यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले. त्यांचे एकमेव नांव समोर आल्याने त्यांची या पदावर अविरोध निवड करण्यात आली. ब्रिजमोहन मालपाणी हे येधील श्री यशोदा दाल मिलचे मालक असून प्रसिद्ध उद्योजक आहे.
आजमितीला गोरक्षण संस्था चे पलाना ता.कारंजा येथे स्थावर मालमत्ता असून तेथे गाई चे दोन मोठे शेड, कुटार, कडबा साठवण करीता दोन गोडाऊन व १३० एकर शेतजमीन आहे. सद्यस्थितीत १२३ गोवंश असून त्यांचे करीता पिण्याचे पाण्याचा हौद, गोठा आहे. तसेच कारंजा येथे देखील संस्थेने गोवंश करता मोठे शेड उभारले आहे व स्व मालकीचे कार्यालय आहे.
या आमसभेला सुभाष बजाज, विजय बगडे, शालिग्राम भिवरकर, शेखर बंग, अशोक इन्नाणी, मनोज अग्रवाल, अमल चवरे, प्रमोद चवरे, राजकुमार बंग, श्रीराम इंगळे, राजेश बजाज, पद्म देवडा, आशिष तांबोडकर, राजाराम भूतडा, ललीत चांडक संस्थेचे सर्व विश्‍वस्त उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक व संचलन आशिष तांबोडकर यांनी तर आभार सभेचे अध्यक्ष राजाराम भूतडा यांनी  व्यक्त केले.
     

No comments

Powered by Blogger.