Header Ads

भाजयुमो शिबीरात १२१ रक्तदार्त्यांनी केले रक्तदान

BJYM Blood Donation Camp - Janta parishad

भाजयुमो शिबीरात १२१ रक्तदार्त्यांनी केले रक्तदान

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनोज खडसे यांनी सपत्नीक केले रक्तदान 

     कारंजा (का.प्र.) दि. ११ -  कोरोनाच्या संकटसमयी देशात आणि राज्यात रक्ताचा प्रचंड प्रमाणात  तुटवडा जाणवत आहे. रक्ताची पुरेशी उपलब्धता निर्माण व्हावी या दृष्टिने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या ‘टर्म’च्या वर्षपूर्तीचे औचित्य साधत भाजयुमो कारंजा शहर व ग्रामीण यांच्यावतीने १० जून रोजी महेश भवन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ‘रक्त संकलन अभियान’ अंतर्गत शिबीराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांच्याहस्ते  करण्यात आले. यावेळी पहिल्या १० रक्तदात्यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  शिबीरात एकुण १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
     आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण आपण वाचवू शकलो, ही कल्पनाच निखळ समाधान देणारी असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार पाटणी यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली तर समारोपीय भाषणात भाजयुमो जिल्हाध्यक्ष विजय काळे यांनी १२१ रक्तदात्यांचे आभार मानत यांनी एकप्रकारे समाजाचे ऋण फेडल्याची भावना व्यक्त केली. 
     यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गोलेच्छा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विजय पाटील काळे, जिल्हा सरचिटणीस सुनिल काळे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, शहाध्यक्ष ललित चांडक, उपाध्यक्ष राजीव भेंडे, माजी तालुकाध्यक्ष संदीप गढवाले, भाजयुमो शहराध्यक्ष अमोल गढवाले, तालुकाध्यक्ष मंगेश धाने, सौ.मिनाताई ज्ञानेश्वर काळे, डॉ.अजय कांत, डॉ.सुशिल देशपांडे, तालुका सरचिटणीस श्रीकृष्ण मुंदे, नगरसेविका सौ.प्राजक्ता उमेश माहितकर, सौ.चंदाताई भिमराव कोळकर, अशोक इन्नाणी आदींची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.
     यावेळी १२१ युनिट रक्त संकलीत करण्याचे कार्य अकोला ब्लड बँकेच्यावतीने सौ.कांतादेवी डाळे, वैभव वायचाळ, डॉ.दिगांबर निरगुडे, डॉ.एस.एस.स्वामी, राजु जामकर, संतोष लांडे, किसन गाटे, सोनु भाकरे तसेच सोनु गुलालकरी यांच्या चमुने केले. शिबीराचे वैशिष्ट म्हणजे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बाबरे कॉलनी येथील मनोज खडसे यांनी सपत्नीक रक्तदान केले.
     शिबीराच्या यशस्वीतेसाठी भाजपा शहर सरचिटणीस शशिकांत वेळुकर, रंजीत रोतेले, गुड्डू पाटील कानकिरड, संदीप काळे, बंट्टी डेंडुळे, ललित तिवारी, अतुल धाकतोड, कुलदीप अवताडे,  पं.स.सदस्य रूपेश शहाकार,  संकेत नाखले, संजय घुले, दिनेश वाडेकर, कुणाल महाजन, सौ.पायल तिवारी, आनंद इन्नाणी, उमेश माहितकर, मनोज शिवाल, सचिन कनोजे,  समिर देशपांडे, मारोती फुरसडे, गौरव कुर्मवंशी, प्रविण धारस्कर, प्रसाद देशमुख, अखिलेश बोरकर, सचिन काळे, अजय देवरणकर, रितेश  चोकसे , गजानन कडूकार,  राजेश भागवत, सवीज जगताप, अभिनव तापडीया, आदींसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.  

No comments

Powered by Blogger.