Header Ads

वाशिम जिल्ह्यात आज ६ कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आज ६ कोरोना पॉझिटिव्ह 

तालुकानिहाय वाशिम -४, कारंजा -१, मंगरुळपीर -१ 

ऍक्टीव रुग्ण संख्या पोहोचली १२ वर; आजवरचे एकुण रुग्ण २० 

वाशिम (जनता परिषद) दि.१० - आज रोजी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार, ६ कोरोना व्यक्तींचे कोरोना चाचणी विषयक अहवाल हा पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे जिल्ह्यातील आजवरची एकुण संख्‌या ही २0 वर पोहोचली आहे. 
कारंजा तालुक्यातील ग्राम शेमलाई येथील गर्भवती महिला कोरोनाग्रस्त 
कारंजा तालुक्यातील ग्राम शेमलाई येथील एक २० वर्षीय गरोदर महिलेचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. सदरहू महिला ही पुणे येथून शेमलाई येथे आली होती. त्यानंतर गत 7 दिवस सदरहू महिला ही आपले मामाचे गांवी कारंजा तालुक्यातीलच ग्राम वाल्हई येथे गेली होती. यामुळे कारंजा तालुक्यासह ग्राम वाल्हई व शेमलाई येथे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 
शेलुबाजार येथील ४८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह; पालघर जिल्ह्यातून परतलेली
मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम शेलुबाजार येथील ४८ वर्षीय महिला ही रेड झोन असलेले पालघर येथून आली होती.  सदर महिलेचे कुटुंबातील तीन व्यक्तींचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील दोघांचे अहवाला हे निगेटिव्ह आले आहे. 
उर्वरित चारही रुग्ण हे बोराळा येथील पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील 
उर्वरित चार रुग्णांमध्ये ३ हे निमजगा येथील तर १ बोराळा येथील असून हे चारही बोराळा येथील कोरोना बाधीत रुग्णाचे संपर्कातील होते. निमजगा येथील एकाच कुटुंबातील ६० वर्षीय व ६५ वर्षीय महिलेेसह ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तर बोराळा हिस्से येथील एका व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. 
आता पावेतो प्राप्त २०  रुग्णांपैकी २ जणांचा मृत्यू झाला असून ६  हे बरे झाले आहेत तर सद्यस्थितीत १२ रुग्ण हे ऍक्टीव रुग्ण आहेत. 

No comments

Powered by Blogger.